लोणावळा : 83 वर्षीय आजोबांकडून 32 वर्षीय नातवाची गोळी झाडून हत्या, अपघाताचा बनाव

मुंबई तक

Lonavala Murder Case : लोणावळ्यात 83 वर्षीय आजोबांनी परवानाधारक रायफलमधून 32 वर्षीय नातवावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पुरावे लपवून घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Lonavala Murder Case
Lonavala Murder Case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लोणावळा : 83 वर्षीय आजोबांकडून 32 वर्षीय नातवाची गोळी झाडून हत्या,

point

अपघाताचा बनाव, पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबियांची आजोबाला मदत?

Lonavala Murder Case, कृष्णा पांचाळ : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात 32 वर्षीय नातवाची आजोबांनीच गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता भुशी परिसरातील मोतीराम हॉटेलमध्ये घडली. पोलिसांच्या तक्रारीनुसार, 83 वर्षीय मोतीराम रावजी मराठे यांनी परवानाधारक रायफलमधून त्यांचा नातू अभय मराठे याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात अभय याचा मृत्यू झाला. घटना समोर आल्यानंतर लोणावळा परिसरात या प्रकरणाची चर्चा झाली असून लोणावळा शहर पोलिसांनी तपास सुरू केला.

हेही वाचा : नवऱ्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाहिला बायकोचा व्हिडिओ, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा

कुटुंबातील इतर सदस्यांनी आरोपी आजोबांना साथ दिली?

पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी आरोपी आजोबांना साथ दिल्याचा आरोप आहे. घटनेचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढून लपवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तसेच अभयचा मृत्यू रायफलची साफसफाई करताना अचानक गोळी सुटल्याने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, ते हॉटेल याच कुटुंबाचे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय.., पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?