प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय.., पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?
Crime News : मेरठमध्ये राजमिस्त्री तालिबच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण हत्येत बदललं आहे. पत्नी इल्मा आणि तिचा कथित प्रियकर अमन यांच्यावर गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय..,
पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?
Crime News : मेरठच्या फतल्लेहपूर परिसरातील 30 वर्षीय राजमिस्त्री तालिबच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण आता हत्येच्या आरोपापर्यंत पोहोचलं आहे. तालिबचा 28 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्याची पत्नी इल्माने तालिबचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यानंतर नातेवाईकांनी तालिबचा मृतदेह मुजफ्फरनगर येथे नेऊन दफन केला. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वी काढलेल्या मृतदेहाच्या छायाचित्रांमध्ये गळ्यावर संशयास्पद खुणा दिसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यानंतर तालिबच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला.
हेही वाचा : Mumbai Adivasi Student Protest | पोलिसांनी ताब्यात घेतलं? नेमकं काय घडलं?
स्कार्फने गळा आवळून पतीची हत्या?
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह दफन करण्यापूर्वी इल्मा घरातील मौल्यवान वस्तू गोळा करताना दिसली होती. त्यानंतर परिसरातील काही लोकांनी इल्माचे ब्युटी स्टुडिओ चालवणाऱ्या अमनसोबत कथित संबंध असल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी तालिबचा मोबाइल मागितला असता तो हरवल्याचं इल्माने सांगितलं. मात्र, शोध घेतल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी कपड्यांमध्ये लपवलेला मोबाइल सापडला. मोबाइलमधील संभाषण, कॉल डिटेल आणि व्हॉइस रेकॉर्डिंगशी संबंधित माहिती तपासल्यानंतर कुटुंबीयांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर त्यांनी तालिबचा गळा दुपट्ट्याने आवळून हत्या केल्याचा आरोप केला.
हेही वाचा : परभणी : कर्जाचा डोंगर, दुष्काळाचा फटका, कुटुंब रस्त्यावर आलं, मिरखेल गावात काय घडलं?
