कोल्हापूर : प्रेयसीचं लग्न ठरलं, संतापलेल्या तरुणाने थेट कड्यावरुन ढकलून संपवलं

मुंबई तक

11 Oct 2026 (अपडेटेड: 11 Oct 2026, 03:17 PM)

Kolhapur murder case : लग्न ठरल्यानंतर प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणावरून तरुणीला नाईकवाडी येथील कड्यावरून ढकलल्याची घटना समोर आली आहे. आरोपी श्रीपाद वडू याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.

Kolhapur Murder Case

Kolhapur Murder Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : प्रेयसीचं लग्न ठरलं

point

संतापलेल्या तरुणाने थेट कड्यावरुन ढकलून संपवलं

Kolhapur Murder Case : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात नाईकवाडी येथील कड्यावरून ढकलून 23 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील 25 वर्षीय आरोपी श्रीपाद दिनकर वडू याने तरुणीच्या खुनाची कबुली दिली आहे. सुरुवातीला तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?

प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने केला खून 

गारगोटी येथील अवधूत कॉलनीमध्ये श्रीपाद दिनकर वडू आणि 23 वर्षीय तरन्नुम बशीर नाईक हे एकमेकांच्या घरासमोर राहत होते. त्यातून दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तरन्नुम ही महागाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान, तरन्नुमचे लग्न ठरले. त्यामुळे तिने श्रीपादसोबतचे प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. तरन्नुमने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने दोघांमधील वाद वाढल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : नात्यानं आजी लागणाऱ्या विधवा महिलेसोबत प्रेमविवाह, कुटुंबियांचा थरारक प्लॅन, तरुणाचा काढला काटा

तरन्नुमला थेट कड्यावरून खाली ढकलून दिले

शुक्रवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास श्रीपादने तरन्नुमला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर तो तिला भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथील कड्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला. तेथे तरन्नुमने आपले लग्न ठरल्याचे सांगत यापुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध राहणार नसल्याचे स्पष्ट केले. याच कारणावरून श्रीपाद संतप्त झाला. त्याने तरन्नुमला थेट कड्यावरून खाली ढकलून दिले. या घटनेत तरन्नुमचा मृत्यू झाला. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर श्रीपादने ती बेपत्ता झाल्याचा बनाव केला. त्यानंतर तो स्वतःहून भुदरगड पोलीस ठाण्यात हजर झाला.

श्रीपादने सुरुवातीला तरन्नुम बेपत्ता असल्याचा बनाव केल्याने या प्रकरणाबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने तरन्नुमला कड्यावरून ढकलून दिल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तरुणीच्या मृत्यूच्या घटनेमुळे तिच्या नातेवाइकांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत. लग्न ठरल्यामुळे प्रेमसंबंध संपवण्याच्या निर्णयावरून झालेल्या वादातून तरुणीचा जीव गेल्याची ही घटना जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.