Crime News : आईने दारूसाठी पैसे देण्यास आपल्या मुलाला नकार दिला होता. यानंतर मुलाने आपल्याच आईवर फावड्याने हल्ला करत संपवलं. त्यानंतर तो तरुण गंगेत गेला आणि स्नान करून आला. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हल्ला केलेल्या तरुणाची राजू (वय 36) अशी ओळख समोर आली. तर त्याच्या मृत आईची सावित्री देवी (वय 65) अशी ओळख समोर आली. त्याने काही दिवसांपूर्वीच आपली पत्नी रश्मीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ, 'या' राशींवर देवी मातेचा आशीर्वाद
आई आणि मुलांत दारूचे पैसे मागण्यावरून वाद
घडलेल्या घटनेनुसार, आई सावित्री देवी आणि मुलगा राजू यांच्यात दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद होत असत. राजू हा आपली आई सावित्री देवीकडे सतत पैशांची मागणी करत. सावित्री देवीने एक दिवस पैसे देण्यास नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. अशा स्थितीत राजूने आईवर फावड्याने हल्ला करत आईला संपवले आणि गंगा नदीवरून स्नान करून आला. यानंतर ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीती अशी दुहेरी स्थिती निर्माण झाली आहे.
पहाटे अडीच वाजता दारूच्या नशेत आईवर प्राणघातक हल्ला
ग्रामस्थांच्या म्हणण्यांनुसार, राजूला दारूचे व्यसन आहे, तो पिऊन आईकडे पैशांची मागणी करायचा. तिने नकार दिल्यानंतर त्यांच्यात दारूवरून सतत वाद होत असत. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पहाटे सुमारे अडीच वाजता, दारूच्या नशेत असलेल्या राजूने घरातील फावड्याने आईवर प्राणघातक हल्ला केला, ज्यात आईच्या डोक्यातून गंभीर रक्तप्रवाह होऊ लागला होता, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील शेजाऱ्याने मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा : दिल्लीमध्ये CJP चं आज पुन्हा आंदोलन; जंतर-मंतरकडे कूच, नेमकं काय घडतंय?
हल्ल्यानंतर गंगेवर केलं स्नान
आईची निर्घृण हत्या करणारा आरोपी तरुण हा गुन्हा केल्यानंतर गावाबाहेरील रामगंगा कालव्यावर गेला. तिथे त्याने मित्राला बोलावले आणि गंगेत स्नान करायला जात असल्याचे सांगून उन्नाव जिल्ह्यातील बक्सर येथील चंद्रिका घाटावर गेला. गंगेत स्नान करून तो घरी परतला असता, नंतर आईक़डे पाहत राहिला, नंतर पोलिसांनी त्याला अटक केले.
ADVERTISEMENT












