लातूर: मुली घरातही असुरक्षित, दोन्ही लेकींवर बापाचा लैंगिक अत्याचार; आईनं पाहिलं

मुंबई तक

11 Oct 2026 (अपडेटेड: 11 Oct 2026, 06:04 PM)

Latur Crime : लातूर येथे बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घृणास्पद घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या 3 ते 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी ही घटना आहे.

Latur crime

Latur crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नराधम बापाने तीन ते चार वर्षाच्या लेकीला केला चुकीचा स्पर्श 

point

मुली घरातही असुरक्षित

Latur Crime : अनिकेत जाधव - लातूर येथे बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घृणास्पद घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या 3 ते 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी ही घटना आहे. लातूरच्या अहमदपुर शहरातील प्रभावतीनगर येथील आहे. संबंधित प्रकरणात नराधम आरोपी बापाची ओळख विजय दिगंबर स्वामी अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : इंटरनेट सेवा, मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्ववत करा - सर्वोच्च न्यायालय

नराधम बापाने तीन ते चार वर्षाच्या लेकीला केला चुकीचा स्पर्श 

नराधम बाप विजय हा आपल्या आपल्या दोन मुली एक तीन वर्षीय आणि दुसरी साडे चार वर्षीय मुलीसोबत राहत होते. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पीडितेची आई सोनी विजय स्वामी यांनी तक्रारीत नमूद केलं की, 7 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास काहीतरी हालचाल सुरु असल्याचा संशय आला होता. ती जागी झाली आणि तिने घरातील लाईट लावली असता, नराधम बाप विजय हा मुलीच्या गुप्तांगाला चुकीचा स्पर्श करत होता. अशा परिस्थितीत पीडितेच्या आईने विरोध केला असता, विजयने सांगितलं की तुला आणि तुझ्या मुलीला जीवे मारेन, अशी धमकी दिली होती. 

पत्नी सोनिया यांच्या तक्रारीनंतर, अहमदपूर शहर पोलिसांनी आरोपी पती विजय याच्या विरोधात अहमदपूर शहर पोलीस ठाण्यात कलम 65 (2), 351, (3), 4, 5. (डी), 5 (एन), 6 अन्वये एफआरआय दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला वडिलांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास एपीआय श्रीमंगल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाकडून केला जातो. 

हे ही वाचा : पालघर हादरले! घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची हत्या; नेमकं काय घडलं?

मुली घरातही असुरक्षित

दरम्यान महिला, मुली तसेच तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. समाजात असो की, घरात मुली किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना सातत्याने घडू लागलेल्या आहेत.