10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह, विवाहबाह्य संबंधातून बायकोच्या प्रियकरानं नवऱ्याला संपवलं

मुंबई तक

• 08:00 AM • 12 Oct 2026

Crime News : प्रेम विवाह केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. घडलेल्या घटनेत काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाल्याची माहिती समोर आली.

crime news (AI Photo)

crime news (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

10 वर्षांपूर्वी निशा नावाच्या तरुणीसोबत विवाह

point

पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्यावर गोळीबार 

Crime News : प्रेम विवाह केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. घडलेल्या घटनेत काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाल्याची माहिती समोर आली. मृत नवऱ्याची अंशुल अशी ओळख समोर आली. ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील खोडा पोलीस ठाण्यातील आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : इंटरनेट सेवा, मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्ववत करा - सर्वोच्च न्यायालय

10 वर्षांपूर्वी निशा नावाच्या तरुणीसोबत विवाह

घडलेल्या घटनेनुसार, अंशुलने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन 10 वर्षांपूर्वी निशा नावाच्या तरुणीसोबत विवाह केला होता. त्यांना दोन मुलं देखील आहेत, ती गावात आजीसोबत राहतात. अंशुलचा चुलत भाऊ, पप्पू, हा गंगा भगत नावाने ओळखला जातो, गेल्या दोन वर्षांपासून खोडा येथे राहत होता. याच काळात निशा आणि पप्पू यांचे एकमेकांशी अनैतिक प्रेमसंबंध होते. मृत अंशुलला याची माहिती मिळाली असता, त्याने कुटुंबाकडे अनेकदा तक्रार केली, मात्र समाजात आपले नाव खराब होईल या चिंतेमुळे हे प्रकरण दाबून टाकले.  

पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्यावर गोळीबार 

चौकशीदरम्यान, मुख्य आरोपी हा (पप्पू वय 35) याने सांगितलं की, त्याला आणि निशा (वय 30) हिला एकमेकांसोबत विवाह करायचा होता. हे साध्य करण्यासाठी, त्यांनी अंशुलला संपवण्याचा कट रचला. या कटाचा भाग म्हणून पप्पूने गावातून एक पिस्तूल आणि काडतुसे आणली. 10 ऑक्टोबर 2026 रोजी, अंशुल कामावरून दोन दिवसांची सुट्टी घेऊन गेला होता, तर निशा ही कामावर गेली होती. अंशुलला घरी एकटे पाहून पप्पूने त्याच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात गुन्हा केल्यानंतर, पप्पू फोनवरून निशाच्या सतत संपर्कात राहिला आणि तिला खुनाची माहिती देत होता. 

हे ही वाचा : यूट्यूबर ध्रुव राठीची मध्यरात्री सुटका, जंतर-मंतरवर आल्यास ..पोलिसांचा 'तो' इशारा

11 ऑक्टोबर 2026 रोजी मृत बहिणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घडलेल्या घटनेच्या आधारे, तातडीने पुढील कारवाई करत पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपी पप्पू यांच्या सांगण्यावरून हत्येत वापरण्यात आलेले गावठी पिस्तूल आणि एक रिकामे काडतूस पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.