पतीकडून गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या DNA टेस्टचा आग्रह, गरोदर महिलेचं भयंकर पाऊल

मुंबई तक

• 02:15 PM • 12 Oct 2026

Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात पतीकडून पत्नीच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीचा आग्रह धरला जात असल्याच्या आरोपानंतर पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या DNA टेस्टचा आग्रह

point

गरोदर महिलेचं भयंकर पाऊल

Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात पतीकडून पत्नीच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या पितृत्वाबाबत संशय घेतला जात असल्याच्या आरोपानंतर एका 23 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जी सुष्मिता असे या महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांनी पती जी अभिलाष याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. सुष्मिता पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या पतीकडून बाळाच्या पितृत्वाची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा आग्रह धरला जात होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : भाजपच्या माजी आमदाराची 70 ते 80 जणांकडून हत्या, संतापलेला जमाव अन्... नेमकं घडलं तरी काय?

गरोदर महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप 

जी सुष्मिता हिचा विवाह सुमारे 18 महिन्यांपूर्वी गादिपेड्डापुर गावातील जी अभिलाष याच्याशी झाला होता. सुष्मिताची आई जनाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिलाष पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अभिलाषची आई शशिरेखा हिच्याकडूनही सुष्मिताला त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे सुष्मिता मानसिक तणावाखाली होती, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : भाजपच्या माजी आमदाराची 70 ते 80 जणांकडून हत्या, संतापलेला जमाव अन्... नेमकं घडलं तरी काय?

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

23 जून रोजी सुष्मिताच्या सीमंतम म्हणजेच ओटी भरण्याच्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी तिचे कुटुंबीय सासरच्या घरी गेले होते. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान वाद झाला. त्यावेळी अभिलाषने गर्भात वाढत असलेल्या बाळाचे पितृत्व निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करून घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा आरोप आहे. या वादात गावातील ज्येष्ठांनी मध्यस्थी केली. त्यानंतर काही काळासाठी परिस्थिती शांत झाली होती. मात्र, दोन दिवसांनंतर म्हणजेच 25 जून रोजी सुष्मिता सासरी मृतावस्थेत आढळली. सततचा अपमान आणि छळ यामुळेच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर सुष्मिताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अलादुर्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 85 आणि 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पती किंवा नातेवाइकांकडून होणारा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यासंदर्भातील या कलमांनुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अभिलाष आणि त्याची आई शशिरेखा यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर सुष्मिताच्या कुटुंबीयांनी दुःख व्यक्त केले आहे. माध्यमांशी बोलताना तिच्या आईने पालकांना आपल्या मुलीचा विवाह ज्या पुरुषाशी होतो, तो भविष्यात तिच्याशी कसा वागेल, हे आधीच समजू शकत नाही, अशी भावना व्यक्त केली.