नालासोपारा: तरुणाची गरबा खेळणाऱ्या मुलींबाबत अभद्र टिप्पणी, आरोपी अटकेत

मुंबई तक

• 02:04 PM • 13 Oct 2026

Nalasopara crime news : नालासोपारा पश्चिममध्ये एक लाजिरवाणी आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पश्चिममधील धेदनगर येथील वेबकॉर्न जिममध्ये नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळणाऱ्या महिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Nalasopara crime news (AI Photo)

Nalasopara crime news (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आरिफचे गरबा खेळण्याबाबत अश्लील वक्तव्य 

point

आरिफच्या मोबाईलमध्ये 30 हून अधिक अश्लील व्हिडिओ 

Nalasopara Crime News : प्रवीण नलावडे - नालासोपारा पश्चिममध्ये एक लाजिरवाणी आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पश्चिममधील धेदनगर येथील वेबकॉर्न जिममध्ये नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळणाऱ्या महिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. संबंधित प्रकरणात आरोपीचा मोबाईल फोन जप्त केलेल्या तपासणीतून धक्कादायक खुलासे समोर आले, त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, ही दुर्दैवी घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींचे भाग्य उजळणार, नवपंचम योग पैशांचा पाऊस पाडेल

आरिफचे गरबा खेळण्याबाबत अश्लील वक्तव्य 

घडलेल्या घटनेनुसार, नालासोपारा येथील पश्चिम छेडानगर वेबकॉर्न जिममधील स्थानिक तरुण रौनक यादव, सागर गायकवाड आणि कमलेश चौधरी हे व्यायामासाठी जिममध्ये गेले होते. याचवेळी घटनास्थळी आरिफ आयुब शेख देखील घटनास्थळी उपस्थित होता. रौनक यादव आणि इतर तरुणांसमोर आरिफने गरबा खेळणाऱ्या महिलांबाबत अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप आहे, नवरात्रीत मी जातो तेव्हा 30-40 मुली सहज येतात. 

दरम्यान, आरिफचं हे बोलणं ऐकून रौनक यादव आणि इतर तरुणांनी हे प्रकरण महिलांच्या लैंगिक शोषणाशी आणि एका गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला. विलंब न करता त्या तरुणांनी कठोर पावले उचलली, आरिफचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यातील गॅलरी तपासली. मोबाईल फोनच्या तपासानंतर प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला. 

हे ही वाचा : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांचा राडा! मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाचं डोकं फोडलं VIDEO

आरिफच्या मोबाईलमध्ये 30 हून अधिक अश्लील व्हिडिओ 

आरिफने मोबाईलमध्ये काही तरुणींसोबत शारीरिक संबंध बनवून 30 हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळले. नंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होता. आपण पकडले जाऊ या भीतीने तो अनेक फाइल्स डिलीट करण्याचा प्रयत्न करत होता.