"आई काळी जादू करते...", लेकाचा भलताच संशय डिझेल टाकून आईला पेटवलं

मुंबई तक

• 04:33 PM • 13 Oct 2026

Crime News : लेकाला आईने काळी जादू केल्याचा संशय होता आणि अनेक वर्षांपासून गावात झालेल्या मृत्यूला तो जबाबदार धरत होता. याचमुळे दुर्गेशने आपल्या आईला पेटवून दिल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली.  

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आई गंभीरपणे भाजली

point

घटनेच्या काही दिवसांपूर्वी तरुण हैदराबादहून गावी परतला

Crime News : तेलंगणा जिल्ह्यातील मेडक जिल्ह्यातील एलुपेट गावात 40 वर्षीय शेजमजुर असलेल्या कर्रे सोयम्मा यांचा भाजून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत महिलेचा मुलगा कर्रे दुर्गेश यानेच आईची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासातून समोर आले की, दुर्गेशला आपली आई काळी जादू करत असल्याचा संशय होता आणि अनेक वर्षांपासून गावात झालेल्या मृत्यूला तो तिलाच जबाबदार धरत होता. याचमुळे दुर्गेशने आपल्या आईला पेटवून दिल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेचे कपडे काढले, कारवाईऐवजी पोलिसांनी घेतले आशीर्वाद

आई गंभीरपणे भाजली

संबंधित प्रकरणात पोलिसांनी संशय व्यक्त केला की, आरोपीने आपल्या ऑटो रिक्षातून डिझेल काढून आईला पेटवून दिले. अशातच आई ही गंभीरपणे भाजली गेली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी एका शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पोलीस या हत्येमागील आणि हल्ल्यामागील हेतूचा पुढील तपास करत आहेत. 

घटनेच्या काही दिवसांपूर्वी तरुण हैदराबादहून गावी परतला

10 ऑक्टोबर रोजी टेकमल मंडळात घडलेल्या घटनेप्रकरणी तिचा 21 वर्षीय मुलगा, ऑटो रिक्षा चालक कर्रे दुर्गैश यांच्यावर आरोप करण्यात आले होते. घडलेल्या घटनेनुसार, दुर्गेश हा घटनेच्या सुमारे 10 दिवसापूर्वीच हैदराबादहून गावी परतला होता. 

या घटनेनंतर पोलिसांनी गावात जाऊन तपास केला असता, महिलेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी एका रुग्णालयात नेला होता. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना महिलेच्या काळ्या जादूच्या आरोपांना दुजोरा देणारा कोणताही एक पुरावा आढळून आलेला नाही. त्यांनी संशय व्यक्त केला की, मुलगा हा अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने तरुण त्या प्रभावाखाली होता. 

हे ही वाचा : नालासोपारा: तरुणाची गरबा खेळणाऱ्या मुलींबाबत अभद्र टिप्पणी, आरोपी अटकेत

पोलीस हत्येच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. आरोपी मुलगा हा दुर्गेशला ताब्यात घेण्यात आले असून, आईच्या हत्येमागील हेतू निश्चित करण्यासाठी प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.