तुळजाभवानी मंदिरात पोलिसांचा राडा! मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाचं डोकं फोडलं VIDEO

मुंबई तक

13 Oct 2026 (अपडेटेड: 13 Oct 2026, 01:02 PM)

Dharashiv Crime News : पितळी गेटमधून प्रवेश नाकारल्याने वाद; तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप, घटनेचा व्हिडिओ 'मुंबई Tak'च्या हाती

Dharashiv Crime News

Dharashiv Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तुळजाभवानी मंदिरात पोलिसांचा राडा!

point

मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाचं डोकं फोडलं, काय घडलं?

Dharashiv Crime News, गणेश जाधव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरातील पितळी गेटमधून काही जणांना प्रवेश देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षक संजय ननावरे यांना तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचे डोके फुटून तो जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ 'मुंबई तक'च्या हाती लागला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Astrology : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींचे भाग्य उजळणार, नवपंचम योग पैशांचा पाऊस पाडेल

नेमका वाद कशावरून झाला?

तुळजाभवानी मंदिरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक विधी सुरू असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान, मंदिराच्या पितळी गेटमधून काही जणांना आत प्रवेश देण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्यावर असलेल्या मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षक संजय ननावरे यांनी  नियमांनुसार प्रवेश देण्यास नकार दिला. यानंतर संबंधित सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : मावस मेहुण्याच्या प्रेमात पडली पत्नी, दोघांनी मिळून काढला पतीचा काटा, घरमालकावर आळ यावा म्हणून...

हातातील कड्याने वार; सुरक्षा रक्षक जखमी

या घटनेदरम्यान सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर हातातील कड्याने वार करण्यात आल्याचा आरोप असून, त्यात त्याचे डोके फुटले आणि तो जखमी झाला. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

गुन्हा दाखल होणार का?

मारहाणीच्या घटनेनंतर संबंधित सुरक्षा रक्षकाने न्यायासाठी धाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आरोपी पोलीस कर्मचारी असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात, संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते आणि गुन्हा दाखल होतो का, याकडे लक्ष लागले आहे.