मावस मेहुण्याच्या प्रेमात पडली पत्नी, दोघांनी मिळून काढला पतीचा काटा, घरमालकावर आळ यावा म्हणून...

मुंबई तक

Crime News : अंशुल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 12 तासांत उलगडा केला. हत्येच्या आरोपावरून पत्नी निशा आणि तिचा प्रियकर पप्पू उर्फ गंगा भगत यांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मावस मेहुण्याच्या प्रेमात पडली पत्नी

point

दोघांनी मिळून काढला पतीचा काटा, घरमालकावर आळ यावा म्हणून...

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या खोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिलाईकाम करणाऱ्या 35 वर्षीय अंशुल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 10 ऑक्टोबर रोजी वंदना विहार कॉलनीतील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उलगडा केला. अंशुल यांची 30 वर्षीय पत्नी निशा आणि तिचा मावस मेहुणा 35 वर्षीय पप्पू उर्फ गंगा भगत यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. अंशुल यांना बाजूला करून लग्न करण्याच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : Personal Finance: कंपनीकडून मिळणारे शेअर्स म्हणजे मोफत संपत्ती की छुपा धोका?

पप्पू गावातून बेकायदा पिस्तूल घेऊन आला अन्.. 

अंशुल आणि निशा हे मूळचे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील रहिवासी होते. दोघेही नोएडातील एका शिलाई कंपनीत काम करत होते. पप्पू गेल्या दोन वर्षांपासून निशाच्या संपर्कात होता. गेल्या काही महिन्यांपासून तो अंशुल आणि निशा यांच्यासोबत राहत होता. अंशुल यांना दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत कुटुंबीयांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे अंशुल यांना मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यासाठी पप्पू गावातून बेकायदा पिस्तूल घेऊन आला होता. 10 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने अंशुल खोलीत एकटे होते. दुपारी ते झोपले असताना पप्पूने त्यांच्या मागून डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आणि त्याने निशाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : वर्गमैत्रिणीच्या घरी गेला अन् गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, दहावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?