Jalna Crime News : गौरव साळी - जालन्यात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाने चॉकलेटचे अमिष दाखवून 9 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. जालना शहरातील सुंदरनगर परिसरातील ही घटना समोर आली आहे. शेख सलीम शेख नजीर असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीची ओळख समोर आली आहे. या प्रकरणी संशयितावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बकरी चारायला गेली मुलगी, नराधमानं लहान भावासमोर केला अत्याचार
आरोपी लहान मुलींना चॉकलेट देऊन करायचा लक्ष्य
नराधम आरोपी हा लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा : "आई काळी जादू करते...", लेकाचा भलताच संशय डिझेल टाकून आईला पेटवलं
महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमलेली दिसून आली होती. नागरिकांनी संशयित आरोपीला कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला आहे. केवळ जालनाच नसून देशभरात महिला, मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












