अमरावती : भाजप नेते अनिल बोंडेंना तीन महिने कारावास आणि २० हजारांचा दंड

मुंबई तक

• 12:57 PM • 05 Apr 2022

भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना अमरावतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास आणि २० हजारांचा दंड ठोठावला आहे. तत्कालीन नायब तहसीलदारांना केलेली मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला आहे. ३० सप्टेंबर २०१६ रोजी, अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित राहील्याने […]

Mumbaitak
follow google news

भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना अमरावतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास आणि २० हजारांचा दंड ठोठावला आहे. तत्कालीन नायब तहसीलदारांना केलेली मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

हे वाचलं का?

३० सप्टेंबर २०१६ रोजी, अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित राहील्याने अनिल बोंडे यांनी वरुड तहसीलचे तत्कालीन नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना याबाबत विचारणा केली. यावेळी बोंडे आणि काळे यांच्यात वाद झाला.

नांदेड : अज्ञातांनी गेलेल्या गोळीबारात बांधकाम व्यवसायिक संजय बियाणींचा मृत्यू

या दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडालेली असताना बोंडे यांनी आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार काळे यांनी केली होती. ज्यानंतर वरुड पोलिसांनी अनिल बोंडेंविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात तब्बल पाच वर्षांनी जिल्हा सत्र न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. या निर्णयाविरुद्ध आपण हायकोर्टात धाव घेणार असल्याचंही बोंडे यांनी सांगितलं.

‘कायदा हातात घेऊ नका, डीजे-लाऊड स्पीकर बंद करा’, भोंगा आंदोलनानंतर आयुक्तांनी भरला सज्जड दम

    follow whatsapp