Dombivali Crime : मनी हाईस्ट वेब सीरिज पाहून बँक कर्मचाऱ्याने लुटले ३४ कोटी, आरोपीला पुण्याहून अटक

मुंबई तक

07 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, डोंबिवली जगभरात मनी हाईस्ट ही वेबसीरिज चांगलीच गाजली. ही सीरीज पाहून कुणाला बँक रॉबरीची आयडिया सुचल्याचं ऐकिवात नव्हतं. मात्र डोंबिवलीत असा प्रकार घडला आहे. डोंबिवलीत मनी हाईस्ट ही वेबसीरिज पाहून बँकेच्या कॅश मॅनेजरने आपल्याच बँकेच्या तिजोरीत हात साफ केला. थोडी थोडकी नाही तर ३४ कोटी रूपये त्याने लंपास केले. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतल्या […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, डोंबिवली

हे वाचलं का?

जगभरात मनी हाईस्ट ही वेबसीरिज चांगलीच गाजली. ही सीरीज पाहून कुणाला बँक रॉबरीची आयडिया सुचल्याचं ऐकिवात नव्हतं. मात्र डोंबिवलीत असा प्रकार घडला आहे. डोंबिवलीत मनी हाईस्ट ही वेबसीरिज पाहून बँकेच्या कॅश मॅनेजरने आपल्याच बँकेच्या तिजोरीत हात साफ केला. थोडी थोडकी नाही तर ३४ कोटी रूपये त्याने लंपास केले. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतल्या MIDC भागात ३४ कोटी रूपये चोरीला गेले अशी बातमी समोर आली होती. त्यासंदर्भातली ही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. या चोरीच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडली होती घटना?

डोंबिवलीतल्या आयसीआयसीआय बँक ही एमआयडीसीच्या निवासी विभागात आहे. आरोपी अल्ताफ शेख या बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजर या पदावर काम करत होता. लवकर श्रीमंत होण्यासाठी त्याने एक वर्षापूर्वी तिजोरी लुटण्याची योजना तयार केली. त्यासाठी त्याने मनी हाईस्ट ही वेब सीरिज पाहून त्याने हे प्लानिंग केलं होतं. वेब सीरिज पाहिल्यानंतर त्याने बँक लुटण्याचा मास्टर प्लान तयार केला. त्यानंतर बँकेच्या तिजोरीतून पैसे कसे लुटायचे याचंही मायक्रो प्लानिंग केलं. अल्ताफ शेख कॅश कस्टोडियन मॅनेजर होता त्यामुळे त्याला बँकेचा कोपरा अन कोपरा माहित होता.

मनी हाईस्ट स्टाईल चोरी नेमकी कशी केली?

एक दिवस त्याने हे पाहिलं की बँकेची तिजोरी ज्या ठिकाणी ठेवली गेली आहे तिथे एसी दुरूस्त करण्याचं काम सुरू आहे. मग त्याने सुरक्षा व्यवस्थेत कुठे ढिलाई आहे हे शोधून काढलं. त्यानंतर रॉबरी म्हणजे दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य असतं ते गोळा केलं. त्याने ९ जुलैच्या दिवशी बँकेला सुट्टी असते त्यादिवशी हा डाका घातला. तिजोरीतून त्याने ३४ कोटी रूपये चोरले. त्याआधी त्याने सगळ्या कॅमेरांची हार्ड डिस्क काढून फेकून दिली. एसीचं काम सुरू होतं त्यामुळे त्याने एसी डक्टचा जो भाग मोकळा होता त्यातून पैसे बँकेच्या मागे फेकले.

या चोरीनंतर त्याने काय केलं?

यानंतर त्याने बँकेच्या वरिष्ठांना सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब झाल्याचं सूचित केलं. तसंच तिजोरीतले पैसे योग्य आहेत का? हे तपासण्यासाठी एक पथक बँकेत बोलावलं. एकीकडे हा तपास सुरू असताना दुसरीकडे त्याने त्याचे तीन मित्र अहमद खान, कुरेशी आणि अनुज गिरी या तिघांना बोलावलं. ३४ कोटींपैकी १२ कोटी रूपये त्यांना दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी प्रकरणाचा कसून शोध सुरू केला

बँकेतून एवढी मोठी रक्कम चोरीला गेल्याने पोलिसात तक्रार झालीच. त्यानंतर पोलिसांनी विविध प्रकारे छडा लावून या प्रकरणातल्या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ कोटी रूपयेही जप्त केले. या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अडीच महिन्यांनी बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरला म्हणजेच अल्ताफ शेखला अटक केली. अल्ताफ शेखला पुण्याहून अटक करण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अल्ताफ शेख आणि त्याची बहीण नीलोफर यांच्यासह पाच जणांना अटक केली. अल्ताफकडून पोलिसांनी ९ कोटी रूपये जप्त केले आहेत.

    follow whatsapp