राष्ट्रवादीत गेलेले खडसे पडले एकाकी? गिरीश महाजन – गुलाबराव पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास

मुंबई तक

• 02:00 PM • 27 Jan 2022

– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडल्याचं चित्र दिसत आहे. जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील आणि जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. गुलाबराव पाटील आणि महाजन यांच्या एकत्रित प्रवासामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. जामनेर तालुक्यात […]

Mumbaitak
follow google news

– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी

हे वाचलं का?

भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडल्याचं चित्र दिसत आहे. जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील आणि जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. गुलाबराव पाटील आणि महाजन यांच्या एकत्रित प्रवासामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

जामनेर तालुक्यात आज एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी एकत्रित हजेरी लावली होती.

बोदवड नगरपंचायत ठरली वादाचं कारण?

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अनपेक्षित धक्का बसला. खडसेंचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर मधील बोदवड येथील नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. खडसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला ७ तर शिवसेनेला ९ जागा मिळाल्या. भाजपला इथे केवळ १ जागा मिळाली असली तरीही बोदवडमध्ये खडसेंचं साम्राज्य संपवण्यात हातभार लागल्यामुळे भाजप नेते खुश असल्याचं चित्र आहे.

या पराभवानंतर एकनाथ खडसेंनी आरोप करत शिवसेना आणि भाजप यांची छुती युती झाली आहे. याचमुळे बोदवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाल्याची टीका केली होती.

एकनाथ खडसेंच्या या टीकेला आज गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आपल्या मनगटात दम हवा, याची युती आहे-त्याची युती आहे या गप्पा करण्यात काय अर्थ आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होतात, विधानसभा तुम्ही हरलात…तुमच्या गावात चार ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नाहीत. मुक्ताईनगरमध्ये तुमचा नगराध्यक्ष राहिला नाही. आता बुदवड ही तुमच्या मतदारसंघातली नगरपालिका होती, पण ती सुद्धा तुमच्या हातातून गेली आहे. आरोप आणि टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमचं पाहा ना. जामनेरमध्ये सर्व पक्ष एकत्र होतात आणि भाजप एकट पडतं. म्हणून आम्ही रडत बसत नाही…आम्ही लढतो आणि सर्व जागा जिंकवून आणतो”, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

    follow whatsapp