Gujarat: भाजपला गुजरातमध्ये भिडणारा ढाण्या वाघ, पठ्ठ्याने दुसऱ्यांदा मारलं मैदान!

भाग्यश्री राऊत

08 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:25 AM)

Jignesh Mevani: वडगाम: गुजरातमध्ये (Gujarat) 2017 ला आंदोलक म्हणून एक चेहरा समोर आला तो म्हणजे जिग्नेश मेवाणी… (Jignesh Mevani) ज्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवाणी हे आमदार म्हणून निवडून आले होते. पण, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोप्पी नव्हती… कारण, वडगाम मतदारसंघात आम आदमी पार्टी (AAP) आणि MIM या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होता. ज्याचा […]

Mumbaitak
follow google news

Jignesh Mevani: वडगाम: गुजरातमध्ये (Gujarat) 2017 ला आंदोलक म्हणून एक चेहरा समोर आला तो म्हणजे जिग्नेश मेवाणी… (Jignesh Mevani) ज्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवाणी हे आमदार म्हणून निवडून आले होते. पण, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोप्पी नव्हती… कारण, वडगाम मतदारसंघात आम आदमी पार्टी (AAP) आणि MIM या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होता. ज्याचा फटका मेवाणींना बसणार असं बोललं जात होतं. पण, आता निकाल हाती आल्यानंतर नेमकं काय घडलं? मुस्लिम मतांची संख्या जास्त असूनही MIM च्या उमेदवाराचा मेवाणींना फटका बसला का? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (gujarat election result jignesh mevani wins from vadgam seat defeating bjp candidate)

हे वाचलं का?

खरंतर गुजरातमध्ये वडगाम मतदारसंघ कधीही चर्चेत नव्हता. पण हा मतदारसंघ चर्चेत आला तो 2017 साली, आणि त्याचं कारण ठरलं जिग्नेश मेवाणी. एक आंदोलक म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पण, 2022 च्या निवडणुकीत जिग्नेश मेवाणींसाठी ही निवडणूक सोप्पी नव्हती.

या मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. त्याचं कारण होतं, भाजपचे उमेदवार मणीभाई वाघेला. ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि या मतदारसंघावर त्यांचा प्रभावही होता. दुसरीकडे आप आणि MIM या दोन्ही पक्षानं या मतदारसंघात उमेदवार दिले. या मतदारसंघातलं जातीय समीकरण पाहिलं तर सर्वाधिक संख्या आहे ती मुस्लिम मतदारांची. या मतदारसंघात तब्बल 82 हजार मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे MIM च्या उमेदवाराचा त्यांना फटका बसेल असं बोललं जातं होतं.

Gujarat: हार्दिक, जिग्नेश, अल्पेश.. गुजरात निवडणुकीत ‘या’ तरुण त्रिकुटाची काय आहे अवस्था?

शिवाय आपचे उमेदवार दिल्पेश भाटीया हे या मतदारसंघातला लोकप्रिय चेहरा होता. त्यामुळे काँग्रेसचा गड वडगाम त्यांच्या हातून जाणार, यंदा समीकरण बदलणार अशा चर्चांनी जोर धरला होता. पण, आता प्रत्यक्ष निकाल हाती आला आहे. त्यात जिग्नेश मेवाणी विजयी झाले आणि काँग्रेसनं आपला गड कायम राखला.

या मतदारसंघात MIM मुळे समीकरणं बदलतील ही शक्यता होती. पण ती कुठेतरी फोल ठरलेली दिसते आहे. 82 हजार मुस्लिम मतदार असूनसुद्धा MIM फॅक्टर या मतदारसंघात चालला नाही. एमआयएमच्या उमेदवाराला फक्त 2 हजार मतं मिळाली. त्याचा फारसा फटकाही जिग्नेश मेवाणींना फटका बसला नाही.

‘Aam Aadmi Party’ ची राष्ट्रीय राजकारणात दणक्यात एन्ट्री; गुजरात हरुनही मिळणार नवी ओळख

कारण, 2017 ला मेवाणींना 95 हजार मतं मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास तो आकडा गाठला आहे. पण, या ठिकाणी भाजपच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसते. भाजपला तब्बल 12 हजार मतं जास्त मिळाली. पण त्यामागं कारण सांगितलं जातंय, ते काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार. भाजपचे उमेदवार मणीभाई वाघेला हे काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गडात भाजपची मतं 2017 पेक्षा वाढल्याचं बोललं जातं आहे.

    follow whatsapp