साखर कारखान्याचा संचालक झाल्यावर लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा !

मुंबई तक

• 11:01 AM • 15 Oct 2021

अजित पवार हे त्यांच्या भन्नाट भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आज त्यांनी असाच एक किस्सा सांगितला आणि बारामतीकर खो खो हसले. हा किस्सा इतर कुणाचाही नव्हता तर त्यांचं लग्न कसं जमलं त्याचा हा किस्सा होता. पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा ही अजित पवारांची पत्नी आहे. त्याबद्दल अजित पवारांनी हा किस्सा सांगितला ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. […]

Mumbaitak
follow google news

अजित पवार हे त्यांच्या भन्नाट भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आज त्यांनी असाच एक किस्सा सांगितला आणि बारामतीकर खो खो हसले. हा किस्सा इतर कुणाचाही नव्हता तर त्यांचं लग्न कसं जमलं त्याचा हा किस्सा होता. पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा ही अजित पवारांची पत्नी आहे. त्याबद्दल अजित पवारांनी हा किस्सा सांगितला ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे वाचलं का?

काय म्हणाले अजित पवार?

‘मला लग्नाआधी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर मला डायरेक्टर केलं गेलं. त्यामुळं मला लग्नाला सोपं गेलं. पोरगा कारखान्याचा डायरेक्टर आहे, म्हणून मला पद्मसिंह पाटलांनी त्यांची बहीण दिली, असं अजित पवार म्हणाले.

अनेक जण कारखान्यावरून टीका करतात. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेने महाराष्टातील 12 कारखान्याचे टेंडर काढलं आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी टेंडर भरा, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल म्हणून विकासाचा पैसा शेतकऱ्यांकडे वळवला आणि शेतकऱ्यांना मदत केली, असंही ते म्हणाले ज्यानंतर एकच हशा पिकला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. पुन्हा एकदा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेला आहे.. 21 पैकी 21 जागा मिळवत पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपलं सोमेश्वर कारखान्याचवरील वर्चस्व कायम राखलं आहे. आज याच साखर कारखान्याच्या 60 व्या हंगामातील मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे बिनविरोध झालेले संचालक संग्राम सोरटे यांनी ट्रॅक्टर शोरूम सुरू केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर ची खरेदी जोरात होतेय. असे सांगताना पवार यांनी दत्तामामांच शोरूम कारच आणि सोरटेंच शोरुम ट्रॅक्टरच आणि आम्ही गि-हाईक असंही अजित पवार म्हणाले.

माळेगाव कारखान्याच्या बदलाबाबत अजित पवार यांनी तावरे सोडून इतर आडनावांचा अध्यक्ष करीन असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली. त्याचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले साहेबांना वाटेल तेव्हा बाळासाहेबांना राजीनामा द्यावा लागेल. तोपर्यंत इच्छुकांनी देव दर्शन बंद करावे. माळेगाव च्या कार्यक्रमात कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी अजित दादांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यावर मिश्किलपणे टिपणी करत योगेश तुझा अभ्यास चांगला झालाय आता साहेबांनी लक्ष ठेवले पाहिजे, असं म्हणत आमदारकीवर लक्ष ठेवू नको म्हणजे झालं असंही अजित पवार म्हणाले.

    follow whatsapp