Sharad Pawar: ‘मी राष्ट्रपती निवडणूक लढवणार ही चर्चा निराधार, Prashant Kishor यांच्याशी भेट अराजकीय’

मुंबई तक

• 01:29 PM • 14 Jul 2021

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार (President Elections) बनविण्याच्या चर्चांना स्वत:च पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला याबाबत फोनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवार असं म्हणाले की, ‘या सगळ्या निराधार गोष्टी आहेत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल माझ्याशी चर्चा केली ही गोष्ट […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार (President Elections) बनविण्याच्या चर्चांना स्वत:च पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला याबाबत फोनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवार असं म्हणाले की, ‘या सगळ्या निराधार गोष्टी आहेत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल माझ्याशी चर्चा केली ही गोष्ट पूर्णपणे निराधार आहे.’ असं म्हणत पवारांनी या सगळ्या चर्चांवर पडदा टाकला आहे.

हे वाचलं का?

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

‘प्रशांत किशोर यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल (President Candidate) माझ्याशी चर्चा केली ही गोष्ट पूर्णपणे निराधार आहे. याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला माहित नाही की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी नेमकी कोणते कॅल्क्यूलेशन केले आहे ते मला माहित नाही. जेव्हा ते मला भेटले तेव्हा ती बैठक अराजकीय होती, यावेळी फक्त सामान्य चर्चा झाली. एवढंच नव्हे तर 2024 च्या निवडणुकांबाबत देखीलचर्चा झाली नाही.’

वास्तविक असे मानले जात आहे की, प्रशांत किशोर हे संपूर्ण विरोधी पक्षाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाऊ शकते. पण आता स्वत: पवारांनीच या वृत्ताचं खंडन केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार यांनी तब्बल तीन ते चार वेळा त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. 2022 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत देशाच्या नव्या राष्ट्रपतींसाठी पुन्हा निवडणूक होईल. त्यामुळेच विरोधी पक्ष आतापासूनच आपला उमेदवार शोधण्यात व्यस्त आहे आणि त्यासाठी योग्य ती मोर्चेबांधणी देखील करत आहे.

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या वेळी केके वेणुगोपाल आणि प्रियंका गांधीही तेथे उपस्थित होते.

Sharad Pawar: पवारांच्या मनात नेमकं काय?, प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

खरं तर प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही काम केलेले आहे आणि भाजपला सत्ता मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. यानंतर त्यांनी पंजाब, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये रणनीतिकार म्हणून काम केले होते.

    follow whatsapp