जयंत पाटलांकडून राज ठाकरेंना बुजगावण्याची उपमा, म्हणाले…

मुंबई तक

03 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

औरंगाबाद येथील जाहीर सभेत बोलत असताना केलेल्या प्रक्षोभक विधानावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन 4 एप्रिलला राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टीमेटमवरुन पोलिसांनी राज्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद येथील जाहीर सभेत बोलत असताना केलेल्या प्रक्षोभक विधानावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन 4 एप्रिलला राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टीमेटमवरुन पोलिसांनी राज्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना बुजगावण्याची उमपा दिली आहे.

मोठी बातमी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

“भाजप सध्या काही बुजगावण्यांना पुढे करुन लोकांना मुख्य प्रश्नापासून विचलीत करण्याचं काम करत आहे. जनतेमधली नाराजी दडवण्यासाठी सध्या या राजकीय भोंगे वाजवण्याचं काम सुरु आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

4 तारखेला मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाही तर मग मी ऐकणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत बोलताना दिला होता. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मनसेकडून उद्या राज्यात कोणताही अनुचित प्रसंग घडणार नाही असं म्हटलं आहे. असा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्र पोलीस योग्य ती कारवाई करतील असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.

उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते! प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

तरुणांचं करिअर खराब करण्याचं काम कोणीही करु नये. घोषणा देणारे, चिथावणी देणारे आपली कामं करत असतात. परंतू तरुण रस्त्यावर उतरुन आपलं करिअर खराब करतात. त्यामुळे कोणीही अशा चिथावणीला बळी पडू नये असं जयंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डेसिबलची मर्यादा न पाळणाऱ्या भोंग्यांवर कारवाई नियमाप्रमाणे केली जाईल असंही स्पष्ट केलं.

आंब्याच्या झाडावर दगड मारले जातात, बाभळीच्या नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

    follow whatsapp