पंजाबमध्ये कंगनाच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव, जोरदार घोषणाबाजी

मुंबई तक

• 12:23 PM • 03 Dec 2021

अभिनेत्री कंगना रणौतच्या कारवर पंजाबमध्ये घेराव घालण्यात आला तसंच तिच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे. काही दिवसांपासून कंगना चर्चेत आहे. कारण तिने केलेलं वक्तव्य. 1947 मध्ये आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं ते 2014 मध्ये असं वक्तव्य कंगना रणौतने केलं होतं. त्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली होती. तसंच तिने शीख […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री कंगना रणौतच्या कारवर पंजाबमध्ये घेराव घालण्यात आला तसंच तिच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे. काही दिवसांपासून कंगना चर्चेत आहे. कारण तिने केलेलं वक्तव्य. 1947 मध्ये आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं ते 2014 मध्ये असं वक्तव्य कंगना रणौतने केलं होतं. त्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली होती. तसंच तिने शीख समाजाविरोधातही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्याचे पडसाद पंजाबमध्ये उमटले. कंगना रणौत पंजाबमध्ये गेली तेव्हा तिच्या कारवर घेराव घालण्यात आला.

हे वाचलं का?

कंगनाने यासंदर्भातला व्हीडिओ पोस्ट केला आहे. शुक्रवारी कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये हे दिसतं आहे की कंगनाची कार घेरण्यात आल्याचं दिसतं आहे. शेतकऱ्यांनी या कारला घेराव घातला आहे. कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे की पंजाबमध्ये माझी कार गेली तेव्हा लगेच कारला घेराव घालण्यात आला. मी काय राजकीय व्यक्ती आहे का? ही कोणत्या प्रकारची वागणूक आहे? असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.

अभिनेत्री कंगनाने इंस्टा स्टोरी स्टेटस ठेवत ही माहिती दिली.

काय म्हणाली होती कंगना?

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले त्यानंतर कंगनाने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की खलिस्तानी दहशतवादी सरकारला त्रास देत आहेत. मात्र तुम्ही त्या महिलेला विसरू नका ज्या महिला पंतप्रधान व्यक्तीने या सगळ्या खलिस्तान्यांना आपल्या बुटांखाली चिरडलं होतं. असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या फेसबुक पोस्टवर खूप टीका झाली होती.

अभिनेत्री कंगना रणौतला ठार मारण्याची धमकी, कंगनाची पोलिसात धाव

यानंतर शीख समुदायाने याच तिच्या पोस्टवरून भावना दुखावल्या असल्याने कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कंगनाच्या विरोधात FIR दाखल केली आहे. या वक्तव्याच्या आधीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आपल्या देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं, खरं स्वातंत्र्य तर 2014 मिळालं असं म्हटलं होतं. त्यावरूनही बराच वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी आतंकवाद्यांसोबत केल्याने कंगना चांगलीच चर्चेत आली होती. कंगनाच्या या प्रतिक्रियेनंतर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने सोमवारी कंगनाविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली आता कंगनाला पंजाबमध्येही विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.

    follow whatsapp