मुंबईत बिबट्याची दहशत! मित्रासोबत घरी जाणाऱ्या तरुणावर हल्ला; आठवडाभरातील पाचवी घटना

मुंबई तक

• 03:31 AM • 01 Oct 2021

एका वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेला 24 तास लोटत नाही, तोच आणखी एक घटना समोर आली आहे. मित्रासोबत घरी जाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. आरेतील विसावा इमारतीच्या जवळ असलेल्या वसाहतीत ६९ वर्षीय निर्मला सिंह यांच्यावर बुधवारी रात्री पावणेआठ वाजेच्या बिबट्याने हल्ला केला होता. घराच्या बाहेरील कठड्यावर […]

Mumbaitak
follow google news

एका वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेला 24 तास लोटत नाही, तोच आणखी एक घटना समोर आली आहे. मित्रासोबत घरी जाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.

हे वाचलं का?

आरेतील विसावा इमारतीच्या जवळ असलेल्या वसाहतीत ६९ वर्षीय निर्मला सिंह यांच्यावर बुधवारी रात्री पावणेआठ वाजेच्या बिबट्याने हल्ला केला होता. घराच्या बाहेरील कठड्यावर बसल्या असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर हा बिबट्या हल्ल्याच्या काही वेळ आधीपासूनच या परिसरात वावरत असल्याचं समोर आलं.

या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण असतानाच आता गोरेगाव परिसरात आणखी एका तरुणाला बिबट्याने लक्ष्य केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली.

२० वर्षीय तरुण त्याच्या मित्रासोबत घरी जात होता. याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. गेला आठवडाभरातील बिबट्याने हल्ला केल्याची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

आरे वसाहतीच्या जंगल परिसरात बिबट्याचा अधिवास आहे. आरे दुग्ध वसाहतीच्या परिसराला लागून असलेलं जंगल कमी होत चालल्याने या भागात बिबट्या आणि मानव संघर्ष वाढू लागल्याचं अधोरेखित करणारी आणखी एक घटना गुरूवारी घडली.

गोरेगावमध्ये घडलेल्या घटनेआधीही या परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात २६ सप्टेंबर रोजी युनिट ३ येथे आयुष यादव या चार वर्षीय मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला होता.

आयुषच्या मामाने प्रसंगावधान दाखवत त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं होतं. त्यानंतर १८ सप्टेंबरला युनिट ३१ येथे ११ वर्षीय रोहित नावाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. रोहितच्या वडिलांनी वडिलांनी बिबट्याच्या लाईट मारल्यानं रोहित वाचला.

याच परिसरात लक्ष्मी उंबरसडे यांच्यावर ३० ऑगस्टला हल्ला झाला होता. त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच युनिट ३२ येथे आणखी एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली होती.

    follow whatsapp