Sharad Pawar : तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, डॉक्टरांनी काय दिला सल्ला?

मुंबई तक

05 May 2024 (अपडेटेड: 05 May 2024, 10:59 PM)

Sharad Pawar Health : लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यात झालेल्या सभा आणि दगदगीमुळे शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. सलग भाषण देत असल्याने पवारांचा घसा खराब झाला आहे. त्यामुळे बारामतीतली सांगता सभा आटोपल्यानंतर शरद पवार गोविंद बागेत विश्रांती घेत आहेत.

sharad pawar tomorrow all program cancelled due to health reason baramati loksabha election 2024

शरद पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहे.

follow google news

Sharad Pawar Health : वसंत मोरे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थतेमुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून शरद पवाराचे (sharad pawar) पायाला भिंगरी लावल्यागत दोरै आणि प्रचारसभा घेत आहे. या निवडणुकीच्या दगदगीमुळेच  शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रातींचा सल्ला दिला आहे. (sharad pawar tomorrow all program cancelled due to health reason baramati loksabha election 2024)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यात झालेल्या सभा आणि दगदगीमुळे शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.  सलग भाषण देत असल्याने पवारांचा घसा खराब झाला आहे.  त्यामुळे बारामतीतली सांगता सभा आटोपल्यानंतर शरद पवार गोविंद बागेत विश्रांती घेत आहेत. दरम्यान खाजगी डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हे ही वाचा : Baramati Lok Sabha 2024 : सुप्रिया सुळे अजित पवारांवर प्रचंड चिडल्या

घसा बसला, शब्दही फुटेना

दरम्यान बारामतीच्या सभेत बोलत असताना शरद पवारांचा आवाज बसलेला, त्यांच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. तरी देखील सुप्रिया सुळेंच्या सभेत त्यांनी भाषण केले होते. यावेशी शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकांसाठीची यंदाची ही बारामतीमधील शेवटची सभा आहे. आपण दरवर्षी शेवटची सभा याच प्रांगणात घेत असतो. पण, ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी यंदा ती जागा आपल्या ताब्यात घेतली. पण कुणी जागा अडवली म्हणून आपलं काही नुकसान होऊ शकत नाही.

महागाई, बेकारी, शेतीचा प्रश्न आहे. सत्ताधारी या कुठल्याही प्रश्नावर बोलताना दिसत नाही. त्यामुळे, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा निवडून येतील, यासाठी मतदान करा,असे आवाहन शरद पवार यांनी नागरीकांना केले होते. 

    follow whatsapp