नवी मुंबई : ट्यूशन टीचरने आठवीच्या मुलीला लाकडी पट्टीने दिले 40 फटके, पीडितेचे सुजले हात

Navi Mumbai : नवी मुंबईतील गोठीवली गावात विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नावाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका ट्यूशन टीचरने इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनीला बेदम मारहाण केली. विद्यार्थीनीने पाढे पाठ न केल्यानं ट्यूशन टीचरने विद्यार्थीनीच्या हातावर तब्बल 20 वेळा लाकडी पट्टीने मारहाण केली. अशा शिक्षेमुळे विद्यार्थीनीच्या हात सुजला.

Navi Mumbai

Navi Mumbai

मुंबई तक

19 Feb 2026 (अपडेटेड: 19 Feb 2026, 10:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईतील गोठीवली गावात विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नावाला काळिमा फासणारा प्रकार

point

मुलीने पाढे पाठ न केल्याने ट्यूशन टीचरकडून मारहाण

Navi Mumbai : नवी मुंबईतील गोठीवली गावात विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नावाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका ट्यूशन टीचरने इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनीला बेदम मारहाण केली. विद्यार्थीनीने पाढे पाठ न केल्यानं ट्यूशन टीचरने विद्यार्थीनीच्या हातावर तब्बल 20 वेळा लाकडी पट्टीने मारहाण केली. अशा शिक्षेमुळे विद्यार्थीनीच्या हात सुजला. विद्यार्थीच्या कुटुंबियांनी तिचा एक्स-रे काढला असता, तिचा हात फ्रॅक्चर दिसून आला नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल

मुलीने पाढे पाठ न केल्याने ट्यूशन टीचरकडून मारहाण

गेल्या पाच वर्षांपासून मुलगी त्याच ट्यूशनमध्ये शिक्षण घेत होती. या प्रकरणी आई पूनम वडके यांनी या प्रकरणी रबाळे पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटलं की, मुलगी एका ट्यूशनमध्ये शिकवणीसाठी जात होती. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्यास सांगितले होते, पण मुलीने पाढे पाठ न केल्याने अमानुष मारहाण केली. तेव्हा कुटुंबियांनी जाब विचारला असता, ट्यूशन टीचरने दुसऱ्या ट्यूशनमध्ये टाकण्यास सांगितले. मुलगी अजिबातच अभ्यास करत नसल्याचे कारण सांगितले. 

हे ही वाचा : तरुण पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला, नवरा व्हीलचेअरवर... बाहेर येताच मृतदेह आढळला

या प्रकरणी रबाळे पोलिसांनी तक्रार नमूद करून घेतली. पोलिस विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी आणि इतर विद्यार्थ्यांची चौकशी करत आहेत. हे प्रकरण लक्षात घेता ठाणे जिल्हा बाल संरक्षण विभागाने हस्तक्षेप केला. तपासाच्या आधारे, संबंधित शिक्षकावर बाल संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

    follow whatsapp