Baramati Lok Sabha 2024 : सुप्रिया सुळे अजित पवारांवर प्रचंड चिडल्या, ''तुम्हाला कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राची...''

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

supriya sule criticize ajit pawar baramati lok sabha election 2024 sunetra pawar sharad pawar rohit pawar
आता म्हणते पुत्री प्रेमामुळे पक्षामध्ये अंतर आलं. पण तुम्ही आम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
social share
google news

Supriya Sule criticize Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात आज सांगता प्रचारसभा पार पडल्या. या प्रचारसभेतून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. 'तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राची काळजी नसेल, तर मी कशासाठी अश्रू वाया घालवू. मी प्रत्येकाच उत्तर देऊ शकते, आरेला कारे म्हणायला ताकद लागत नाही', असा इशारा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) दिला. (supriya sule criticize ajit pawar baramati lok sabha election 2024 sunetra pawar sharad pawar rohit pawar) 

सुप्रिया सुळे बारामतीत प्रचार सभेत बोलत होत्या. 'भाजप आम्हाला आधी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायची, आता म्हणते पुत्री प्रेमामुळे पक्षामध्ये अंतर आलं. पण तुम्ही आम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुत्री प्रेम देशाच्या भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला. 

हे ही वाचा : 'सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातो काय?', अजित पवारांचा चढला पारा

तसेच ''जर तुम्ही म्हणता, पुत्री प्रेमामुळे जर पक्ष फुटला असेल तर मला त्यांना विचारायचंय, मी पक्षाकडे असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं, एक लोकसभेचं तिकीट मागितलं होतं. यांना कधी हवं होत का? जेव्हा लोकसभेचा विषय यायचा तेव्हा साहेब विचारायचे अरे तू लढतोस का? नंतर तोच नेता घरी येऊन म्हणायचा साहेब माझं काही चुकलं का? मला का लोकसभेला पाठवताय? कधीही आजपर्यंत त्यांनी सांगितलं नाही मला लोकसभेची इच्छा आहे का? सांगितल असतं दिल खोलून दिलं असतं, असे सुप्रिया सुळे अजित पवार यांना उद्देशून म्हणाल्या. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ते (अजित पवार) एक वाक्य बोलले, समोरचे येतील, भावूक करतील, म्हणतील शेवटची इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचं हे इलेक्शन पहिलं दुसरं की शेवटचं हा निर्णय तुमचा नसेल. तर माझ्या पाडुरंगाचा असेल. तुमच्या या बुरसटलेल्या विचाराच्या आम्ही नांदी लागणार नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर केली. 

हे ही वाचा : रोहित पवारांच्या अश्रूंचा फुटला बांध, शरद पवारांकडे बघत म्हणाले, 'पुन्हा असं बोलू नका'

'मला सर्व काही माहीत आहे.मलाच सर्व काही माहीत आहे. काही गोष्टी अशा असतात, त्या पोटातचं ठेवायच्या असतात. माझं पोट मोठं आहे. कारण नाती तोडायला नाही तर जोडायला कष्ट लागतात. माझ्या आजींनी जोडून ठेवलेली नाती दिल्लीतले सुई घेऊन तोडायचा प्रयत्न करत आहेत', अशी टीका देखील सु्प्रिया सुळे यांनी मोदी शाहांवर केली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT