Baramati Lok Sabha : 'सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातो काय?', अजित पवारांचा चढला पारा, काय बोलले?
Baramati Lok Sabha 2024 : ज्यांना आपण 15 वर्ष खासदार केलं. पण 15 वर्षाच्या कार्यकाळात केंद्राचा निधी बारामती लोकसभा मतदार संघात येऊ शकला नाही. पंतप्रधान मोदी-अमित शाहांवर टीका करून आणि संसदरत्न मिळवून बारामतीचा सर्वांगिण विकास होऊ शकत नाही, असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला.
ADVERTISEMENT
Ajit Pawar, Sunetra Pawar, Baramati Lok Sabha 2024 : अरे काय तुम्ही टीका करता, महिला लोकसभेवर गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन जाणार का?, आपण जाताना सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातो काय? सुनेत्रा खासदार झाल्यावर मी काय पर्स घेऊन जाणार काय? अरे मी बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. डायरेक्ट मुंबईच गाठाल. पण मी म्हणतो भाऊ, बंधू आपलेच म्हणून जाऊ द्या, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) टीकाकारांना सुनावलं आहे. (ajit pawar criticize supriya sule sadanand sule rohit pawar sharad pawar baramati lok sabha 2024 sunetra pawar)
ADVERTISEMENT
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बारामतीत बोलत होते. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांना आपण 15 वर्ष खासदार केलं. पण 15 वर्षाच्या कार्यकाळात केंद्राचा निधी बारामती लोकसभा मतदार संघात येऊ शकला नाही. पंतप्रधान मोदी-अमित शाहांवर टीका करून आणि संसदरत्न मिळवून बारामतीचा सर्वांगिण विकास होऊ शकत नाही, असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला. तसेच ते म्हणतात मी दम देतो, मी लोकांना दम दिला असता तर मला 25,30 वर्ष बारामतीकरांनी निवडून तरी दिलं असतं का?
हे ही वाचा : राज ठाकरेंची साथ सोडणारा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत!
रोहित पवारांची केली नक्कल
अजित पवार पुढे म्हणाले, मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या सभेत कोणीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, मी पण काढून दाखवतो, असे म्हणत अजित पवारांनी रडण्याची अॅक्टींग केली. असली नौटंकी बारामतीकरांपुढे चालणार नाही. हा रडीचा डाव आहे. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. मी तुम्हाला सांगत होतो असे हे करणारच, असे अजित पवार म्हणाले.
हे वाचलं का?
दरम्यान ह्याला (रोहित पवार) साहेबांचा विरोध असूनही मी झेडपीचं तिकीट दिलं. हडपसरला तयारी करत होता, तिथं चेतन तुपे तयारी करत असल्याने आम्ही जामखेड सूचवलं. त्यानंतर जामखेडमध्ये मी पाठवलं, मी साहेबांचंही ऐकलं नाही. मी तिकीट दिलं. त्यानंतर म्हणाला हडपसरला उभं राहायचंय. आम्ही म्हणालो तू कर्जत जामखेडला आम्ही तिथे मदत करू. आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहे. तुम्ही आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे मी पाहिलेले आहे, अशी टीका देखील अजित पवारांनी रोहित पवारांवर केली.
हे ही वाचा : Jalana Lok sabha Election 2024 : रावसाहेब दानवेंना खोतकर का हवेत?
काही लोकांनी आयुष्यात कुस्ती खेळली नाही, ते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झाले. अरे कुस्तीचे डाव माहितीय का बेटा. चितपट कसं करतात हे माहितीय का?, लगेच फार उड्या मारू नका. हे औटघटक्याचं आहे. हे जे पायाला भिंगरी बांधून फिरताहेत ना, तुम्ही निकालानंतर बघा, हे कुठे गायब होतात बघा, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT