महाचावडी: ठाकरे बंधू 24 तास राजकारण का करत नाही?, आदित्य ठाकरेंचं उत्तर बघाच!
मुंबई Tak महाचावडीवर ठाकरें बंधूंची Super Exclusive मुलाखत पार पडली. ज्यामध्ये आदित्य ठाकरेंनी 24 तास राजकारण करण्याबाबत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: ठाकरे बंधू हे 24 तास राजकारण करत नाही, ते त्यांच्या सोयीने राजकारण करतात. अशी टीका शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सातत्याने होते. पण आता याच टीकेला शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे यांनी नेमकं उत्तर दिलं आहे. मुंबई Tak च्या महाचावडीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे बंधूंची Super Exclusive मुलाखत पार पडली. ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.
मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ही महाचावडी पार पडली. जिथे दोन्ही ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. याचवेळी त्यांना 24 तास राजकारण न करण्यावरून केल्या जाणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं. पाहा त्यावर आदित्य ठाकरेंनी नेमकं काय उत्तर दिलं.
पाहा आदित्य ठाकरेंचं काय म्हणाले..
'24 तास राजकारण म्हणजे काय? आता ही जी काही तीन तिगडी बात बिगडी.. बसलेलं आहे ना सरकार.. त्याच्यात 24 तास राजकारण म्हणजे विमान, हेलिकॉप्टर.. गरागरा घेऊन फिरायचं.. वाट्टेल ते एकमेकांवर शिव्याशाप देतात, टीका करतात. कोण 70 हजार कोटीचा घोटाळा काढतं, कोण जमिनीचा घोटाळा काढतं. हे सगळं झाल्यावर.. गरागरा फिरून.. आज महाराष्ट्राचे हाल का आहेत?'
हे ही वाचा>> '20 जूनला पळालात... त्याच्या महिनाभर आधीच...', महाचावडीवर आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा
'चला.. आम्ही 24 तास राजकारण करत नसू.. पण तुम्ही हा विचार करू शकता का.. आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून किंवा मिंधे आहेत त्यांच्या बाजूला.. किंवा दादा बसलेत.. यामधून कोणी मुख्यमंत्री जर कोरोना काळात असतं तर किती वाट लागली असती महाराष्ट्राची.. जिथे यूपीमध्ये जे झालं तसे महाराष्ट्राचे हाल झाले असते.'










