इन्स्टाग्रामवर मुलीचा मेसेज येताच कळी खुलली, बोलवताच भेटण्यासाठी गेला पण जीवच गेला!
Pune crime : पुण्यात अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवरून मुलगी असल्याचं भासवून मुलाला कात्रज येथे बोलावले आणि नंतर त्याला खेड शिवापूर येथे नेत त्याची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात जुन्या भांडणावरून मुलाचं अपहरण
मुलाला खेडशिवापूर येथे नेलं आणि डोक्यात दगड घालून संपवलं
Pune Crime : राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. पुण्यात सध्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे. एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवरून मुलगी असल्याचं भासवून मुलाला कात्रज येथे बोलावले आणि नंतर त्याला खेड शिवापूर येथे नेले आणि त्याची हत्या केली.
हे ही वाचा : पालघरमध्ये इंस्टाग्रामवर 17 वर्षीय मुलीशी मैत्री आणि लैंगिक अत्याचार, नराधमाकडून सोशल मीडियावर 'तसले' फोटो शेअर
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच दोन विधीसंघर्षित मुलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्यांची नावे समोर आली आहेत. प्रथमेश चिंधू आढळ (वय 19) आणि नागेश बालाजी धबाले (वय 19) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच अमनसिंह सुरेंद्रसिंह गच्चड वय 17 असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
जुन्या भांडणावरून मुलाचं अपहरण
दि : 29 डिसेंबर रोजी मुलगा गाडी घेऊन घरातून पळून गेला होता, पण तो परत न आल्याने त्याच्या आईने दि : 31 डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान संबंधित मुलाच्या मोबाईलचा सीडीआर आणि लोकेशनवरून विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. मृत अमनसिंग गच्चड यास प्रथमेश चिंदू आढळ, नागेश बालाजी धबाले, दोन विधिसंघर्ष बालक आणि इतर मित्रांनी उत्तमनगर परिसरात नेले. नंतर त्यांच्याशी जुन्या भांडणावरून अमनचे अपहरण केले, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
हे ही वाचा : रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विलासरावांच्या...'
मुलाला खेडशिवापूर येथे नेलं आणि डोक्यात दगड घालून संपवलं
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हे बेळगावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. याचवरून त्यांनी आरोपीचा कर्नाटकात शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता महत्त्वाची माहिती समोर आली. आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज येथे बोलावून घेतले, नंतर खेडशिवापूर परिसरात नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगडाने ठेचून त्याला संपवल्याचं सांगण्यात येत आहे.










