कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार? यादीच आली समोर

मिथिलेश गुप्ता

KDMC : केडीएमसी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी कोणता उमेदवार अधिक श्रीमंत आहे, याची यादी आता समोर आली आहे.

ADVERTISEMENT

KDMC municipal elections
KDMC municipal elections
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहे केडीएमसीमधील सर्वात श्रीमंत उमेदवार !

point

श्रीमंत उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे...

Kalyan-Dombivali Muncipal Corporration : कल्याण-डोंबिवली महापालिका ही एक महत्त्वाची महापालिका आहे. याच महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. या निवडणुकीत कोट्याधीश उमेदवारांची मांदियाळी बघायला मिळत आहे. 15 जानेवारी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची स्थावर-जंगम मालमत्ता आता समोर आली आहे.

हे ही वाचा : समोसेवाल्या काकांनी 10 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार, क्रूरतेची सीमा गाठत... न्यायालयाने दिली 20 वर्षांची शिक्षा

या महापालिकेत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती आता समरो आली आहे. राजकीय वारसा लाभलेला तरुण हा उमेदावारही या श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीच नाहीतर हाय प्रोफाइल ठरत असल्याचं चित्र आहे, एकूण श्रीमंत उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

कोण आहे केडीएमसीमधील सर्वात श्रीमंत उमेदवार !

या निवडणुकीत भाजपचे वरुण पाटील यांनी सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून बाजी मारली आहे. माजी नगरसेवक असलेल्या वरुण पाटील यांच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या एकूण मालमत्तेचा आकडा तब्बल 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 रुपये इतका आहे. उद्योग, शेती आणि स्थावर मालमत्तेमुळे ते श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.

इतर श्रीमंत उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे...

माजी नगरसेवक मंगेश गायकर यांचे सुपुत्र श्यामल गायकर यांच्याकडे 26 कोटी 74 लाखांहून अधिक संपत्ती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp