पुण्यात Lockdown चे निर्बंध आणखी कठोर होणार ? महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात..

मुंबई तक

• 06:47 AM • 07 May 2021

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यात कठोर लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ब्रेक द चेनच्या अंतर्गत कठोर निर्बंध लागू आहेतच. असं असूनही पुण्यात रूग्णसंख्या वाढत आहेत त्यामुळे कठोर लॉकडाऊन पुण्यात लावला जावा असं मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी सुचवलं आहे. काही वेळापूर्वीच अजित पवारही पुण्यात दाखल झाले आहेत. आढावा बैठकीनंतर ते या संदर्भात भाष्य […]

Mumbaitak
follow google news

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यात कठोर लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ब्रेक द चेनच्या अंतर्गत कठोर निर्बंध लागू आहेतच. असं असूनही पुण्यात रूग्णसंख्या वाढत आहेत त्यामुळे कठोर लॉकडाऊन पुण्यात लावला जावा असं मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी सुचवलं आहे. काही वेळापूर्वीच अजित पवारही पुण्यात दाखल झाले आहेत. आढावा बैठकीनंतर ते या संदर्भात भाष्य करतील अशीही शक्यता आहे. अशात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी मुंबई तकने संवाद साधला.

हे वाचलं का?

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने बेड मिळवण्यासाठी वणवण

मुरलीधर मोहोळ काय म्हणतात?

गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यात लॉकडाऊन संदर्भात सूचना केल्या आहेत. पुण्यात आणखी कठोर लॉकडाऊन लावण्यात यावा असं कोर्टाने सुचवलं आहे. पण मला असं वाटतं की कोर्टात जी माहिती आणि आकडेवारी सादर केली ती कदाचित खूप जुनी असावी. शासनाच्या माध्यमातून आपण जी काही आकडेवारी पाहतो, त्यातही संख्यांमध्ये विसंगती असते. यातली विसंगती कोर्टातही असावी. पुण्यात कोरोनाची स्थिती बरीच नियंत्रणात आहे.

मागच्या सोळा दिवसांमध्ये जवळपास 15 ते 16 हजार अॅक्टिव्ह रूग्ण कमी झाले आहेत. पुण्यात मृत्यू दरही कमी झाला आहे. मुंबईत 53 ते 54 हजार अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात आज घडीला 1 लाखाच्या आसपास अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर पुणे महापालिकेची जर अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाहिली तर ती 39 हजारांच्या आसपास आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असं मिळून अॅक्टिव्ह रूग्ण हे लाखभराच्या आसपास आहेत. सर्वोच्च न्यायलायचा आम्ही मान राखतो आहोत. त्यांना आम्ही वास्तव काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू.

पुणे : किराणा मालाच्या दुकानात दारुविक्री, पोलिसांनी मालकाला ठोकल्या बेड्या

शहराचे महापौर जे आकडे कोर्टासमोर ठेवण्यात आले आहेत ते काहीसे दिशाभूल करणारे आहेत. एक लाखाच्या आसपास जे अॅक्टिव्ह रूग्ण आहेत ते पुणे जिल्ह्याचे आहेत त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती यांचा समावेश होतो. पुणे शहरापुरता विचार केला तर रूग्णांची संख्या कमी होते आहे. त्यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा विचार महापालिका करत आहे असंही महापौरांनी म्हटलं आहे. त्यामुळे महापौरांनी तरी त्यांच्या बोलण्यातून लॉकडाऊन लावण्याचे किंवा अधिक कठोर निर्बंध करण्याचे संकेत तूर्तास दिलेले नाहीत.

    follow whatsapp