Maharashtra corona update : कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

मुंबई तक

• 04:11 PM • 20 Aug 2021

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी राज्यातील काही भागांत प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णसंख्येचा आलेख स्थिरावताना दिसत असून, शुक्रवारी दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ३६५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के इतका आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं राज्य सरकारनं म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी राज्यातील काही भागांत प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णसंख्येचा आलेख स्थिरावताना दिसत असून, शुक्रवारी दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ३६५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के इतका आहे.

हे वाचलं का?

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं राज्य सरकारनं म्हटलं असून, दररोजच्या रुग्णसंख्येतही मोठी घट झाली आहे. राज्यात दररोज चार ते पाच हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत असून, तीन दिवसानंतर राज्यात चार रुग्ण आढळून आले. गेले दोन दिवस राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते.

आजचे आकडे काय सांगतात?

राज्यात आज ६ हजार ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख २१, ३०५ इतकी आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९६.९७ टक्के इतका आहे.

राज्यात आज ४ हजार ३६५ रुग्णांचं नवीन रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात १०५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा सध्याचा मृत्यूदर दर २.११ इतका आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ५,१९,२१,७९८ नमुन्यांची प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्यात आलेली आहे. यातील ६४,१५,९३५ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

किती रुग्ण आहेत उपचाराधीन?

राज्यात सध्या ३ लाख २२ हजार २२१ रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २ हजार ७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मागील दोन दिवसांत किती रुग्ण आढळले?

आज राज्यात चार हजार रुग्ण आढळून आलेले असले, तरी मागील दिवसांत पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते. १८ ऑगस्टला राज्यात ५ हजार १३२ रुग्ण आढळून आले. तर १९ ऑगस्टला राज्यात ५ हजार २२५ रुग्ण आढळून आले होते.

    follow whatsapp