Mahrashtra Corona update: राज्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर; चार हजार रुग्णांची वाढ

मुंबई तक

• 03:12 PM • 22 Aug 2021

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी दररोज चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी दिवसभरात चार हजारांपेक्षा अधिक रुग्णांची भर पडली. दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट वाढला आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात आज (२२ ऑगस्ट) ४ हजार ७८० रुग्ण कोरोनातून […]

Mumbaitak
follow google news

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी दररोज चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी दिवसभरात चार हजारांपेक्षा अधिक रुग्णांची भर पडली. दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट वाढला आहे.

हे वाचलं का?

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात आज (२२ ऑगस्ट) ४ हजार ७८० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोनातून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ६३ लाक ३१ हजार ९९९ इतकी झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) ९७ टक्के झाला आहे.

दिवसभरात किती मृत्यू झाले?

महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार १४१ रुग्णांचं निदान झालं. तर १४५ रुग्णांचा कोरोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला. राज्यात कोरोना मृत्यूदर सध्या २.११ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५,२२,९२,१३१ नमुने तपासण्यात आले. यापैकी ६४,२४,६५१ म्हणजेच १२.२९ टक्के नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या ३ लाख १२ हजार १५१ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २ हजार ५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात उपचाराधीन असलेल्या रुग्णसंख्या १०० च्या आत आहे.

जळगाव (४०), नंदूरबार (०), धुळे (८), परभणी (१४), हिंगोली (७९), नांदेड (३९), अमरावती (९५), अकोला (१७), वाशिम (१०), बुलढाणा (४१), यवतमाळ (११), वर्धा (६), भंडारा (५), गोंदिया (३), गडचिरोली (२४) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० आत आहे. तर धुळे, जळगाव, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत.

राज्यात विक्रमी लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी (२१ ऑगस्ट) दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याच्या विक्रमाची नोंद केली. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखांच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून, याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचं अभिनंदन केलं.

    follow whatsapp