Shivsena UBT : 'अडीच कोटी द्या EVM हॅक करतो', ठाकरेंच्या नेत्याला ऑफर; प्रकरण नेमकं काय?

रोहिणी ठोंबरे

08 May 2024 (अपडेटेड: 08 May 2024, 01:42 PM)

Shivsena UBT : देशात लोकसभा निवणूक 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी (7 मे) महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान पैसे वाटप, हत्या, EVM जाळपोळ अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. अशा परिस्थितीत आणखी एक गंभीर बातमी चर्चेत आली आहे. EVM मध्ये फेरफार करण्यासाठी सैन्यातील एका जवानाने शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली.

Mumbaitak
follow google news

Shivsena UBT : Ambadas Danve : देशात लोकसभा निवणूक 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी (7 मे) महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान पैसे वाटप, हत्या, EVM जाळपोळ अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. अशा परिस्थितीत आणखी एक गंभीर बातमी चर्चेत आली आहे. EVM मध्ये फेरफार करण्यासाठी सैन्यातील एका जवानाने शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिसांनी या जवानाला अटक केली आहे. (Chhatrapati Sambhaji nagar Ambadas Danve filed complaint against Army Jawan that he offered to EVM hack and In return he demanded Two and Half crore)

हे वाचलं का?

'EVM मध्ये फेरफार करून मतं वाढवून देईन'

आरोपीचे नाव मारुती ढाकणे असून तो जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलात कार्यरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील तो मूळचा रहिवासी आहे. 42 वर्षीय आरोपीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (EVM) चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी शिवसेना (UBT) विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांच्याकडे पैशांची मागणी केली. फेराफार करून मतं वाढवून देईन असा दावाही आरोपीने केला. याप्रकरणी दानवे यांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार केली.

हेही वाचा : Maharashtra Live : "एकनाथ शिंदे 2013 मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते"

दीड कोटींमध्ये डील मग... प्रकरणाचा कसा झाला भंडाफोड?

मंगळवारी (7 मे) सायंकाळी 4 च्या सुमारास आरोपीने शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांचे लहान भाऊ राजेंद्र दानवे यांची छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्यात डीलविषयी चर्चा झाली. आरोपीने केलेली अडीच कोटींची मागणी वाटाघाटीनंतर दीड कोटी रुपयांवर येऊन थांबली, सौदा ठरला.

हेही वाचा : बारामती कोणत्या पवारांकडे जाणार? घटलेल्या टक्क्याने वाढवली चिंता

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'यावेळी आरोपीला राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन मनी म्हणून एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडले.'

कर्ज फेडण्यासाठी वापरली ही युक्ती

अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे साध्या वेशातील पोलिसांचे पथक पाठवून आरोपीला राजेंद्र दानवे यांच्याकडून एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, 'आरोपीवर खूप कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने ही युक्ती वापरली. त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही त्याला अटक केली असून, क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आरोपीविरुद्ध IPC च्या कलम 420 आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

    follow whatsapp