Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Lok Sabha Election Maharashtra Live News : चौथ्या टप्प्यात मतदान असलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा पारा चढला आहे... सर्व घटना घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live updates : लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होत असून, तीन टप्पे पार पडले आहेत. तर उर्वरित चार टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आता दोन टप्प्यातील मतदानच शिल्लक राहिले आहे. महाराष्ट्रातील उर्वरित लोकसभा मतदारसंघात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात नंदूरबार लोकसभा, जळगाव लोकसभा, रावेर लोकसभा, जालना लोकसभा, औरंगाबाद लोकसभा, मावळ लोकसभा, पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, अहमदनगर लोकसभा, शिर्डी लोकसभा, बीड लोकसभा या मतदारसंघांचा समावेश आहे.
पाचव्या टप्प्यात धुळे लोकसभा, दिंडोरी लोकसभा, नाशिक लोकसभा पालघर लोकसभा, भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, दक्षिण मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा, उत्तर पूर्व मुंबई लोकसभा, उत्तर मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा, उत्तर मुंबई लोकसभा हे मतदारसंघ आहेत.
या मतदारसंघातील राजकीय घडामोडी... महाराष्ट्रासह देशभरातली लोकसभा निवडणुकीचे अपडेट्स आणि इतर महत्त्वाबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 10:03 PM • 08 May 2024
सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोकं चिनी लोकांप्रमाणे दिसतात असं विधान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते. त्याच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान या वादानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
- 07:35 PM • 08 May 2024
जालन्यातून अमित शाह यांची इंडिया आघाडीवर टीका
12 लाख करोडचा घोटाळा करणाऱ्या इंडी आघाडीच्या एका मंत्र्याकडून 20 करोडची रोकड जप्त करण्यात आले. काँग्रेसच्या एका खासदाराकडे साडे तीनशे करोड रूपये जप्त करण्यात आले होते.
इंडिया आघाडी, काँग्रेस आणि शरद पवार कंपनीने वर्षभर राम मंदिराला विरोध केला. पण मोदींनी राम मंदिराच केसही जिंकली, भूमिपूजनही केलं आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून जयश्रीराम केलं.
इंडिया आघाडीने राम मंदिरांच्या सोहळ्यात वेगवेगळे बहाणे करून त्याचा बहिष्कार केला. राम मंदिराच्या सोहळ्याला गेले तर त्यांची वोट बँक त्यांच्याशी नाराज होईल.
- 05:50 PM • 08 May 2024
'मुलीचे राजकीय कौशल्य बुडत्या पक्षासाठी अपुरे', निरूपम यांची पवारांवर टीका!
'आदरणीय शरद पवार जी अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता. अडत होतं के लेकीमुळे. त्यांनी आपल्या मुलीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली.आता त्यांचा पक्ष उद्ध्वस्त झाला आहे. त्यांच्या ताज्या विधानाचा अर्थ असा आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, कदाचित त्यांना तशी भीती वाटते. जरी असं झालं नाही तरी काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.
कारण त्यांच्या मुलीकडे असलेले राजकीय कौशल्य बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी अपुरे आहे. पण जे विलीनीकरण होईल ते पुन्हा दोन तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांचे विलीनीकरण होईल.
परिणाम, एक मोठा शून्य.' अशी घणाघाती टीका संजय निरूपम यांनी केली आहे. - 02:03 PM • 08 May 2024
'कोणी रडल काही झालं, तरी सुनेत्रा पवार...', महादेव जानकर काय म्हणाले?
'बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटपावरून विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. पराभव दिसत असल्याने हे आरोप होतायत, यात काही तथ्य नाही. बारामती लोकसभेतून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवारच निवडून येतील, कोणी रडल काही झालं, तरी सुनेत्रा पवार पाच हजाराने का होईना निवडून येतील', असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.
- 02:00 PM • 08 May 2024
Baramati Lok Sabha : मतदान कमी झाल्याची चिंता नाही- अजित पवार
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला. देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालं. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात झालं होतं. 'मतदान कमी झाल्याची आपल्याला चिंता नसल्याचं', अजित पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे मतदान चांगलं असल्याचंही ते म्हणाले.
- 12:21 PM • 08 May 2024
Thane lok Sabha election : "एकनाथ शिंदे 2013 मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश जाणार होते"
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.
"एकनाथ शिंदे हे २०१३ मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. कुठल्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक राहिलात? त्यांच्यासह पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. आम्ही काँग्रेसच्या तिकिटावर कसे निवडून येणार? असे चार आमदारांनी विचारले, त्यामुळे शिंदेंचे बंड फसले", असा दावा राजन विचारे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
"एकनाथ शिंदेंना शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात. याला फोड, त्याला फोड, कुठला पक्ष सोडला, सांगा?", असा सवालही राजन विचारे यांनी केला आहे.
- 12:13 PM • 08 May 2024
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
यासंदर्भातील याचिकांवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी झाली.
राज्य सरकारने नामांतराबद्दल काढलेल्या अधिसूचना कोणत्याही पद्धतीने बेकायदेशीर नाही, असे सांगत न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
- 10:22 AM • 08 May 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि भाजपला निवडणूक आयोगाची नोटीस
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. प्रचारसभांमध्ये मतदारांना प्रलोभने दाखवणारी विधाने केल्याप्रकरणी आयोगाने नोटीस बजावली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांजल अगरवाल यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.
बारामती लोकसभा मतदारसंघासह इतर मतदारसंघात भाषणे करताना मतदान केल्यास शासकीय तिजोरीतून सढळ हाताने निधी वितरित करणार, अशी विधाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्याकडून केली जात आहे.
या प्रकरणी तक्रार आल्यानंतर आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना नोटीस बजावली असून, आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारी आल्याचे नमूद केले आहे.
- 08:57 AM • 08 May 2024
Jalna Lok Sabha : अमित शाह यांची आज जालन्यात सभा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जालन्यामध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. बुधवारी सायंकाळी शाह यांची सभा होणार आहे. तर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी सभा होणार आहे.
- 08:44 AM • 08 May 2024
Aurangabad Lok Sabha election 2024 : खैरेंच्या विरोधात शिंदेंची सभा, काय काय बोलले?
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली. या सभेत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
"येत्या ४ जूनला महायुतीच्या विजयाचा गुलाल उधळणे हीच छत्रपती संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल", असे आवाहन शिंदेंनी केले.
"संभाजीनगर या नावाला विरोध करणारे लोक आपल्याला खासदार म्हणून चालणार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी कायमच संभाजीनगरवर जीवापाड प्रेम केले. त्यामुळे येथील मतदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत", असे शिंदे म्हणाले.
"गेल्यावेळी गडबड झाली पण यावेळी आपल्या हक्काचा धनुष्यबाण निवडून द्यावा. ज्यांनी मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचा अपमान केला त्या इंडी आघाडीला अजिबात मतदान करू नका, उबाठाच्या काळात याकूब मेमनची कबर सजवण्याचे काम त्यांनी केले होते. आता त्यांना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची देखील लाज वाटत आहे", अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली.
"भाजपच्या पाच नेत्यांना अटक करून उबाठा यांना मविआ मजबूत करायची होती पण त्यांचे हे मनसुबे यशस्वी होण्यापूर्वीच शिवसेनेचा धनुष्यबाण काँग्रेसच्या तावडीतून सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला आणि त्यांचा डाव उधळून लावला", असे शिंदे म्हणाले.
"खैरेंना मत म्हणजे इम्तियाज जलीलला मत. संदीपान भुमरे म्हणजे मोदींना मत. विकासाला मत", असे विधान शिंदेंनी या सभेत केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT