शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; दोन महिन्यांनंतर पोटात दुखू लागले अन्...

Crime News : आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध असलेला लाडू देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याविषयी कोणालाच काही माहिती नव्हते. मात्र यानंतर दोन महिन्यांनी पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. वैद्यकीय तपासणीत पीडिता गरोदर असल्याचे उघड झाले आहे. हादरवून टाकणारी बाब म्हणजे तिच्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे समोर आले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:25 PM • 03 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

point

दोन महिन्यांनंतर पोटात दुखू लागले अन्...

Crime News : आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध असलेला लाडू देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याविषयी कोणालाच काही माहिती नव्हते. मात्र यानंतर दोन महिन्यांनी पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. वैद्यकीय तपासणीत पीडिता गरोदर असल्याचे उघड झाले आहे. हादरवून टाकणारी बाब म्हणजे तिच्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशातील देवरिया भागातील ही घटना आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : आई गावाला गेली अन् इकडं बापाने 14 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार, धाकट्या बहिणीला वाचवण्यासाठी बघा काय केलं?

नोव्हेंबर महिन्यातील घटना

पीडित मुलगी ही देवरियातील 'लार' पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. याच गावात असलेल्या एका शाळेत ती इयत्ता आठवीत शिकत आहे. ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडल्याची माहिती आहे. पीडिता नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. वर्गात शिक्षक नसल्याची संधी साधून शाळेतीलच एका विद्यार्थ्याने तिला 'प्रसाद' असल्याचे सांगून एक लाडू खायला दिला. तो लाडू खाल्ल्यानंतर मुलीला ग्लानी येऊ लागली आणि तिची प्रकृती बिघडली.

पीडितेची प्रकृती बिघडल्याचे पाहून, आरोपी विद्यार्थी तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत घेऊन गेला. मात्र, त्याने तिला घरी न नेता आपल्या एका मित्राच्या घरी नेले. तिथे त्या विद्यार्थ्याने आणि एका प्रौढ व्यक्तीने मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि कोणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी देऊन तिला गप्प केले.

सोनोग्राफीनंतर सर्वांनाच धक्का

बदनामीच्या धास्तीने मुलगी दोन महिने गप्प राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. घरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामध्ये ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर मुलीने रडत-रडत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

हे ही वाचा : आधी तिन्ही मुलांना फासावर लटकवलं आणि नंतर आईने प्यायलं डीझेल... नेमकं काय घडलं?

आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. या प्रकरणी माहिती देताना पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष कुमार यांनी सांगितले की, 'या गुन्ह्यात सहभागी असलेला मुख्य आरोपी शुभम सैनी आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास सुरु आहे.'

    follow whatsapp