'तो' नग्नावस्थेतील मृतदेह मुंबईच्या महिलेचा; गोरखपूरमध्ये झाली होती हत्या, कसा झाला उलगडा?

मुंबई तक

• 05:05 PM • 03 Feb 2026

Crime news : काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. खून करुन चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास पूर्ण केला असून खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृत महिला ही मुंबईची असून प्रिया शेट्टी असं तिचं नाव आहे. लव्ह ट्रॅगलमधून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तो' नग्नावस्थेतील मृतदेह मुंबईच्या महिलेचा

point

गोरखपूरमध्ये झाली होती हत्या

Crime news : काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. खून करुन चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास पूर्ण केला असून खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृत महिला ही मुंबईची असून प्रिया शेट्टी असं तिचं नाव आहे. लव्ह ट्रॅगलमधून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रिया मुंबईतून गोरखपूरला का आली आणि तिचा खून कोणी केला, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; दोन महिन्यांनंतर पोटात दुखू लागले अन्...

प्रियाचे लिव्ह-इन रिलेशन

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली 2012 मध्ये.  गोरखपूरचा असलेला विजय साहनी एका खाजगी विमा कंपनीत नोकरीसाठी मुंबईला आला होता. याठिकाणी त्याची ओळख प्रिया शेट्टी हिच्याशी झाली. दोघांमध्ये ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी एकत्र घर घेतले आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. या दरम्यान दोघांनी एका मंदिरात लग्नही केले. प्रियाने एका मुलाला जन्मही दिला, ज्याचे वय सध्या 13 वर्ष असल्याची माहिती आहे.

विजयचा दुसरा विवाह

दरम्यान, 2014 मध्ये विजयच्या कुटुंबियांनी त्याचे लग्न संध्यासोबत लावून दिले. विजय आणि संध्याला तीन मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर प्रियाला विजयच्या पहिल्या लग्नाबद्दल माहिती मिळाली. विजय प्रियाला गोरखपुरलाही घेऊन आला. यामुळे विजय आणि संध्या यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे दोघांनी मिळून प्रियाला संपवण्याचा घाट घातला.

हे ही वाचा : आई-वडिलांचा वाद; अल्पवयीन मुलाचा विळ्याने गळा चिरला, नराधम बाप कुठं लपला?

वाद आणि हत्या

29 जानेवारी रोजी विजय आणि संध्या यांनी एका निर्जनस्थळी नेऊन तिची हत्या केली. हत्या करुन तिचा चेहरा ओळखू नये यासाठी तिचा चेहरा विद्रूप केला. इतकंच नव्हे तर तिच्या अंगावरचे कपडेही काढून नेले. 30 जानेवारी रोजी पोलिसांना प्रियाचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी आव्हान पेलले

या हत्येचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.मात्र या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले.  जवळपास १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.