अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवारांवर आणखी एक मोठी जबाबदारी, महायुती सरकारचा मोठा निर्णय! शासन निर्णय जारी

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यावर शोककळा पसरली.  त्याचबरोबर त्यांची जागा आता कोण घेणार असा प्रश्नही विचारला जात होता. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर काहीसे स्पष्ट झाले. मात्र अजितदादांकडे असलेले बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याविषयी चर्चा रंगली होती. याविषयी आता महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Sunetra Pawar

Sunetra Pawar

मुंबई तक

03 Feb 2026 (अपडेटेड: 03 Feb 2026, 03:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवारांवर आणखी एक मोठी जबाबदारी

point

महायुती सरकारचा मोठा निर्णय! शासन निर्णय जारी

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यावर शोककळा पसरली.  त्याचबरोबर त्यांची जागा आता कोण घेणार असा प्रश्नही विचारला जात होता. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर काहीसे स्पष्ट झाले. मात्र अजितदादांकडे असलेले बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याविषयी चर्चा रंगली होती. याविषयी आता महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्णय जारी केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

पालकमंत्री पदाबाबत शासन निर्णय जारी

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. मात्र अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने काही जणांनी त्यांच्यावर टीकादेखील केली होती. उपमुख्यमंत्री पदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे महायुती सरकारने अजून एक जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री पदासोबत अजितदादांकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. त्यांच्या निधनानंतर पालकमंत्री पदी आता सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडे

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याविषयी देखील जोरदार चर्चा सुरु होती. या पदासाठी प्रफुल पटेल यांची निवड होणार का? असा प्रश्न चर्चेत आला होता. त्यांच्या नावावरुन मोठा वादंग झाल्याचे पहायला मिळाले. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात येणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या की ९ तारखेला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असून मंजूरी मिळाल्यानंतर त्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील.

हे ही वाचा : 'मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर', मीरा-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा एल्गार

सुनेत्रा पवार यांच्याकडे 'या' पदांचीही आहे जबाबदारी

राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ या खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अजितदादांकडे असलेले अर्थमंत्री पद त्यांना न मिळाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 

    follow whatsapp