मुंबई : लिफ्टजवळ थांबलेला वृद्ध महिलेला पत्ता विचारला अन्...थरकाप उडवणारा व्हिडीओ

मुंबई तक

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 11:57 AM)

Kandivali west elderly woman gold chain robbery cctv footage : कांदिवली पश्चिममधील उमंग अपार्टमेंटमध्ये वृद्ध महिलेवर हल्ला करून सोन्याची चेन लुटण्यात आली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Kandivali west elderly woman gold chain robbery cctv footage

Kandivali west elderly woman gold chain robbery cctv footage

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबई : जवळ येऊन पत्ता विचारला अन् वृद्ध महिलेला...,

point

थरकाप उडवणारा व्हिडीओ

Kandivali west elderly woman gold chain robbery cctv footage :  मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटल्याची घटना समोर आली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेशी संवाद साधला आणि अचानक हल्ला करून चेन लंपास केली. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कांदिवली पश्चिम येथील उमंग अपार्टमेंटमध्ये ही लुटीची घटना घडली. एका अज्ञात तरुणाने आधी वृद्ध महिलेकडे परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा पत्ता विचारला. त्यानंतर तो महिलेशी सामान्यपणे संवाद साधू लागला. त्याच्या बोलण्यावरून महिलेला कोणताही संशय आला नाही. मात्र, काही वेळातच या तरुणाने अचानक महिलेवर हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, आरोपीने आधी महिलेशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर संधी मिळताच लुटीची घटना घडवून आणली.

हे वाचलं का?

हेही वाचा : राजू शेट्टींच्या लढ्याला यश, 61 तासांच्या संघर्षानंतर ऊसदराचा फॉर्म्युला ठरला, किणी टोलनाक्यावर रात्री काय घडलं?

काही समजण्याच्या आतच आरोपी चेन घेऊन तिथून पळून गेला

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी वृद्ध महिला आपल्या घराबाहेर लिफ्टची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी एक अज्ञात तरुण तिथे आला. त्याने महिलेला परिसरात राहणाऱ्या एका परिचित व्यक्तीचा पत्ता विचारण्यास सुरुवात केली. महिला आणि आरोपी यांच्यात काही वेळ संवाद झाला. आरोपीचे वागणे सामान्य असल्याने महिलेला त्याच्यापासून कोणताही धोका जाणवला नाही. मात्र, अचानक त्याने महिलेवर हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरल्या. त्यांना काही समजण्याच्या आतच आरोपी चेन घेऊन तिथून पळून गेला. या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना नोंदवली गेली आहे.

हेही वाचा : सतेज पाटील महायुतीला कसे पुरून उरले? बंटी पाटलांनी 'मुंबई Tak चावडी'वर सांगून टाकलं सीक्रेट!

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या फुटेजमध्ये एक तरुण वृद्ध महिलेच्या जवळ येताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ३ नोव्हेंबर २०२६ ही तारीख असून रात्री सुमारे ९ वाजून २३ मिनिटांनी ही घटना घडल्याचे दिसते. आरोपी महिलेच्या जवळ येऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. आता याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. रहिवासी सोसायटीच्या परिसरातच ही घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः एकट्या राहणाऱ्या किंवा दैनंदिन कामांसाठी एकट्याने बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वृद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. फुटेजच्या आधारे आरोपी घटनास्थळी कसा आला, तसेच गुन्हा केल्यानंतर कोणत्या दिशेने गेला, याचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. कांदिवली पश्चिममधील उमंग अपार्टमेंटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.