मुंबई: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीने बाजी मारली. या निवडणुकीत महायुतीच्या सत्ताधारी गटाला आव्हान देत सतेज पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली. विशेष म्हणजे, या निवडणुकीकडे केवळ राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणून न पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत त्यांनी प्रचार केला. अखेर त्यांच्या आघाडीला मिळालेल्या यशानंतर सतेज पाटील यांनी या विजयामागचं नेमकं गणित उलगडलं आहे.
ADVERTISEMENT
'मुंबई Tak चावडी' या विशेष कार्यक्रमात बोलताना सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीतील विजयाचं रहस्य सांगितलं. आपला अजेंडा सुरुवातीपासून स्पष्ट होता, तर विरोधकांचा अजेंडा महायुतीची सत्ता आणण्याचा होता, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय 4500 मतदारांपैकी जवळपास 3000 मतदारांना वैयक्तिक भेटल्याचा खुलासाही त्यांनी केला.
केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी आपण ही लढाई लढल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तीन महिने आधीच त्यांनी प्रचाराचा संपूर्ण आराखडा तयार केला होता. गावनिहाय दौरे, मतदारांच्या भेटी, जेवणाच्या ठिकाणांपासून ते प्रचाराच्या मार्गापर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.
सतेज पाटील मुंबई Tak चावडीवर काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पुरून कसे उरलात?, असा प्रश्न सतेज पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या विजयामागचा अजेंडा, विरोधकांची रणनीती, मतदारांच्या भेटी आणि तीन महिन्यांपूर्वी केलेल्या नियोजनाबाबत सविस्तर भाष्य केलं.
हे ही वाचा>> तारीख अन् वेळ ठरली, गोकुळसाठी आता रस्त्यावरची लढाई; सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांचा संघर्षमोर्चा
1. माझा अजेंडा साडेपाच लाख शेतकरी हा होता!
'माझा अजेंडा क्लिअर होता. साडे पाच लाख शेतकरी हा माझा अजेंडा होता. माझ्या कुठल्याही भाषणात.. जाहीरनाम्यात तेवढं बोललो की, शशिकांत जुयेकर मला चेअरमन करायचेत हे मी बोललो. माझ्या कुठल्याही भाषणात कुठेही असं नव्हतं की, 25 निवडून आणायचेत.. मी म्हणायचो, 25 रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना कसा देईल हा माझा अजेंडा असेल.'
2. महायुतीचा अजेंडा सत्ता आणण्याचा होता!
'त्यांचा अजेंडा होता.. महायुतीचा झेंडा फडकावणे... महायुतीची सत्ता आणणे.. साडे पाच लाख शेतकरी लक्ष ठेवून होते की, मी निवडणूक कशासाठी लढतोय. तर दुधाला 5 रुपये जास्त भाव कसा देता येईल, पशुखाद्याचे दर कसे कमी करता येतील. म्हशीला अनुदान 75 टक्के देणार म्हणून सांगितलं. माझी क्लिअरिटी होती.'
हे ही वाचा>> 'घरात घुसून कार्यक्रम...' पडळकरांनी डिवचलं, तर जयंत पाटलांनी घेतला क्लास; कट्टर विरोधक एकाच मंचावर, काय घडलं?
3. वडिलांनी दिलेला संदेश लक्षात ठेवला!
'निवडणूक लढवत असताना.. हा जो माझ्या वडिलांनी मला जो संदेश दिला की, तुझा अजेंडा फिक्स पाहिजे. कुणाला पाडण्यासाठी नाही.. त्यामुळे मी पाडायची भाषा करत नव्हतो. त्यांच्याकडून बंटी पाटलाला पाडायचंय.. यांचे 25-0 करायचे ही भाषा होती.'
4. 4500 मतदारांपैकी 3000 मतदारांना वन टू वन भेटलो!
'त्यांच्या 4500 मतदारांपैकी 3000 मतदारांना मी वन टू वन भेटलो.. कोल्हापूरमध्ये अजून संस्कृती बरी आहे. मी ज्या-ज्या गावात जायचो तिथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे ठरावदार आहेत.. ते म्हणायचे तुम्ही वैयक्तिक येऊ नका.. तुम्हाला वेळ लागेल सगळ्यांना.. आम्ही 10-10 जण गोळा होतो आणि तिथेच तुम्ही बोला.'
5. मतदारांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन व्यवस्थित केलं!
'आम्ही जायचो.. मी माझी भूमिका मांडायचो... ते माझा सत्कार करायचे, चहा द्यायचे, नाष्टा द्यायचे.. आणि माझा योग्य तो मान-सन्मान करायचे. त्यामुळे मी जे लोकांपर्यंत पोहचत होतो ते व्यवस्थित झालं. प्लॅनिंग आणि एक्झिक्यूशन हे व्यवस्थित झालं.'
6. तीन महिने आधीच 24 दिवसांच्या दौऱ्याचं नियोजन!
'प्रत्येक तालुक्याला 2 दिवस असे 24 दिवस.. हे प्लॅनिंग माझं 3 महिने फायनल होतं. प्लॅनिंगचा रूट फायनल होता. कुठल्या गावातून, कुठे जाणार आहे.. दुपारचं जेवण कुठे असणार आहे.. संध्याकाळचं जेवण कुठे असेल.. हे माझं प्लॅनिंग 3 महिने आधी झालं होतं.'
7. निवडणूक जाहीर होण्याआधीच संस्थांना भेटण्याचं नियोजन!
'निवडणूक लागली आणि मी त्या निवडणुकीत उभा राहिलो अशातील तो भाग नाही. ठराव व्हायच्या आधी कोणत्या संस्थांना भेटी द्यायच्या आणि ज्या सर्वाधिक दूध घालतात.. म्हणजे एक संस्था आहे पन्हाळ्यातील.. ती दुधाचा फरक दिवाळीला.. एका सभासदाला दीड लाख रुपये देते. आणि किमान 30 हजार रुपये.'
8. जुन्या संस्थांचं गोकुळ टिकण्याला प्राधान्य!
'त्यामुळे मी आधीपासून प्लॅनिंग केलं होतं की, ज्या जुन्या संस्था आहेत.. 30-30 वर्ष आहेत. त्यांचा इंटरेस्ट हा या निवडणुकीपेक्षा गोकुळ टिकणं हा आहे.'
9. जवळपास 1800 संस्थांच्या ठरावदारांना भेटण्याचं ठरवलं होतं!
'त्यांचा अजेंडा क्लिअर आहे.. मला जास्त दर कसा मिळणार आणि माझ्या सभासदांना जास्त दर कसा देणार.. आणि गोकुळ कसा टिकणार. यात होता. या संस्था मला माहीत होत्या. जवळजवळ 1800 संस्था अशा आहेत की, त्यांच्या ठरावदारांची सहावी निवडणूक होती ही. त्या संस्थांना मी भेटणार हे ठरवलं होतं. कारण त्यांची गोकुळबद्दलची आस्था होती. त्यामुळे मी हे जे करू शकलो ते चोख नियोजनाच्या जोरावरच..'
असं सविस्तर उत्तर देत सतेज पाटील यांनी गोकुळमधील विजयाचं नेमकं सीक्रेट 'मुंबई Tak चावडी'वर सांगितलं.
गोकुळच्या विजयामागे नेमकं काय होतं?
सतेज पाटील यांच्या या उत्तरातून त्यांच्या प्रचाराची रणनीती स्पष्ट होते. विरोधकांकडून 25-0 करण्याची भाषा केली जात असताना सतेज पाटलांनी मात्र, शेतकऱ्यांना अधिक दूध दर मिळवून देण्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. दुसरीकडे, मतदारांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.
4500 पैकी 3000 मतदारांच्या वैयक्तिक भेटी, प्रत्येक तालुक्यासाठी दोन दिवसांचा दौरा, तीन महिने आधी तयार केलेला प्रचाराचा आराखडा आणि जुन्या दूध उत्पादक संस्थांशी संपर्क या सगळ्या गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं.
त्यामुळे गोकुळची निवडणूक केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन न ठेवता दूध उत्पादकांच्या प्रश्नांशी जोडण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केला. या नियोजनबद्ध प्रचारामुळेच आपण महायुतीच्या सत्ताधारी गटाला पुरून उरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
ADVERTISEMENT












