Congress Ramtek MP News : दिल्लीतील ‘व्होट बचाव, देश बचाव’ रॅलीसाठी जातेवेळी काँग्रेस खासदारांच्या बसमध्ये झालेल्या एका कथित प्रकारामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या प्रवासादरम्यान रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना चापट मारल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
पदाधिकाऱ्यांची केंद्रीय नेतृत्त्वाकडे धाव
या घटनेची गंभीर दखल घेत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे धाव घेतली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि संघटक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार पाठवण्यात आली आहे. या तक्रारीत खासदार बर्वे यांच्या गैरवर्तनाची सविस्तर माहिती देण्यात आली असून, या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : दिवाळी सणाच्या तोंडावर मुरासू चक्रीवादळ, 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट
शिस्तभंगाची कारवाई होणार का?
या प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर तात्काळ कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.
हे ही वाचा : बीड : ट्रकचा भीषण अपघात, दरीत कोसळल्यानंतर भयानक आग, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू
ई-मेलमध्ये काय?
या ईमेलमध्ये म्हटलंय की, 'सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनुसार, खासदारांच्या बसमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये रामटेकचे सन्माननीय खासदार श्री. श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या सन्माननीय खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांच्यावर हात उचलताना (चापट मारताना) दिसत असल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाला असून, यामुळे जनतेमध्ये अत्यंत नकारात्मक संदेश गेला आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे.
एकीकडे आपला पक्ष लोकशाही, घटनात्मक मूल्ये, महिलांचा सन्मान आणि लोकशाही संस्थांच्या संरक्षणासारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत असताना, अशा प्रकारच्या घटनेमुळे जनतेत विरोधाभासी आणि हानिकारक संदेश जातो. कोणतीही परिस्थिती असो किंवा व्यक्तींमधील परस्पर मतभेद असोत, अशा शारीरिक गैरवर्तनाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. विशेषतः समानता, प्रतिष्ठा आणि आदराचे मूल्य जपणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून तर अजिबात नाही. पक्षाने आपली संघटनात्मक शिस्त राखणे, आपल्या महिला लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचे रक्षण करणे आणि अशा वर्तनाला पक्षात थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देणे अत्यंत आवश्यक आहे.'
ADVERTISEMENT












