शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

सुमित भुजबळ

07 Nov 2026 (अपडेटेड: 07 Nov 2026, 02:59 PM)

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छातीचा संसर्ग आणि ब्राँकायटिसच्या त्रासावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी आता डिस्चार्ज दिला.

Sharad Pawar discharged

Sharad Pawar discharged

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

point

घरी उपचार सुरू ठेवण्याचा आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छाती आणि श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती स्थिर होती.  शरद पवार यांना ब्राँकायटिसचा त्रास आणि छातीचा संसर्ग झाला होता. या दोन्ही समस्यांमध्ये आता सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांना स्थिर प्रकृतीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा! 'व्हेंटिलेटर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

घरी उपचार सुरू ठेवण्याचा आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला

शरद पवार यांना 2 नोव्हेंबर रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. काही काळ त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. तेथून ते मुंबईत आले. मात्र, पुढील तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासणी केल्यानंतर त्यांना छाती आणि श्वसनाशी संबंधित संसर्ग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच त्यांना ब्राँकायटिससारखाही त्रास झाला होता. उपचारांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रकृतीतील सुधारणा लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : धाराशिवमध्ये खळबळ, घरात घुसून प्रेयसीच्या आई-बहिणीवर कोयत्याने हल्ला, गर्लफ्रेंडचं Ertiga कारमधून अपहरण

ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी शरद पवार यांना स्थिर प्रकृतीत डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती दिली. आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू राहणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना घरी उपचार सुरू ठेवण्याचा आणि आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. वय लक्षात घेता त्यांना काही अतिरिक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांची प्रकृती ठीक असल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. त्यांचे वैद्यकीय निकष सामान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. तसेच शरद पवार यांच्याशी संवाद झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच ते लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडूनही त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने माहिती घेतली जात होती.