राणा जगजितसिंह पाटील यांची शरद पवारांशी भेट, सुनेत्रा पवारांच्या पाठीशी माहेरचे कुटुंब उभे?

गणेश जाधव

07 Nov 2026 (अपडेटेड: 07 Nov 2026, 06:41 PM)

Rana Jagjit Singh Patil Meet Sharad Pawar : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची माहिती समोर आली.

Rana Jagjit Singh Patil Meet Sharad Pawar

Rana Jagjit Singh Patil Meet Sharad Pawar

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राणा जगजितसिंह पाटील यांनी शरद पवारांची घेतली भेट

point

विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण

point

भेटीमागे वेगवेगळे तर्कवितर्क

Rana Jagjit Singh Patil Meet Sharad Pawar : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची माहिती समोर आली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना चागलंच उधाण आलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

पवार आणि पाटील कुटुंबातील भेटीला विशेष महत्त्व 

राणा जगजितसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भाचे असून सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे आता पवार आणि पाटील कुटुंबातील जुन्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता एक विशेष महत्त्व प्राप्त झाले असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. 

अशातच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची देखील भेट झाली होती. त्यांच्या भेटीदरम्यान दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटात काही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. मात्र त्यावेळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अमित शाहांच्या भेटीसाठी गेले नव्हते. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

राणा पाटील आणि शरद पवारांच्या भेटीमागे काय? 

या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राणा जगजितसिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी राणा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : चर्चगेट विरार फास्ट लोकलमध्ये तुफान हाणामारी, चालत्या लोकलमधून प्रवासी फेकला

भेटीमागे वेगवेगळे तर्कवितर्क

सुनेत्रा पवार यांच्या सासरचे मंडळी म्हणून त्यांनी घेतलेली भेट ही केवळ कौटुंबिक होती की राजकीय होती, हे महत्त्वाचे ठरेल. तसेच पार्थ पवार आणि मल्हार पाटील यांची देखील मैत्री आता राज्यभराच चर्चेचा विषय ठरू लागली आहे. मात्र, या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली आणि तिच्यामागे कोणती राजकीय  भूमिका होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या भेटीमागे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ लावले जात असून, आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात कोणती समीकरणे आकाराला येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.