Maharashtra Rain Update: अकोल्यात तुफान पाऊस, नदीला पूर आल्याने अनेक गावं पाण्याखाली

मुंबई तक

• 02:43 AM • 22 Jul 2021

धनंजय साबळे, अकोला अकोल्यात संध्याकाळपासून जोरदार ते अति मुसळधार पाऊस झाल्याने शहरातल्या मोरणा नदीला मोठा पूर आला असून यामध्ये जवळपास पन्नास ते साठ घर पूर्णपणे बुडाले असून वेळीच लोकांनी यामधून आपला जीव वाचवला. अचानक आलेल्या मोरणा नदीच्या पुरामुळे लोकांमध्ये एकच धावपळ झाली. यावेली लोकांनी कसेबसे आपले जीव वाचवले. या नदीचे पाणी हरिहर पेठ, अंबिकानगर खोलेश्वर, […]

Mumbaitak
follow google news

धनंजय साबळे, अकोला

हे वाचलं का?

अकोल्यात संध्याकाळपासून जोरदार ते अति मुसळधार पाऊस झाल्याने शहरातल्या मोरणा नदीला मोठा पूर आला असून यामध्ये जवळपास पन्नास ते साठ घर पूर्णपणे बुडाले असून वेळीच लोकांनी यामधून आपला जीव वाचवला. अचानक आलेल्या मोरणा नदीच्या पुरामुळे लोकांमध्ये एकच धावपळ झाली. यावेली लोकांनी कसेबसे आपले जीव वाचवले.

या नदीचे पाणी हरिहर पेठ, अंबिकानगर खोलेश्वर, कट खदान, शास्त्रीनगर, खडकी, चांदुर आणि लोणी या गावांना पुराचा वेढा असून येथील अनेक लोक हे वेळीच सुखरुप बाहेर पडले आहेत. तर काही लोक अजूनही आपआपल्या घरातच अडकले असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यानंतर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातली रेस्क्यू टीम बचाव कार्यासाठी धाडली असून आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. दरम्यान, अद्यापही या संपूर्ण भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मोरणा नदीने सध्या आपल्या धोक्याच्या पातळीपेक्षा चार ते पाच फुट भरली असून त्यातील जलप्रवाह हा अत्यंत वेगाने सुरु आहे.

यामुळे नदीकाठच्या लोकांच्या घरांमध्ये वेगाने पाणी शिरलं असून गॅस, सिलेंडर, भांडी, कपडे व इतर अनेक वस्तू या पाण्यात वाहून गेल्या आहेत.

सध्या लोकांना घरांमधून बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करुन असून जास्तीत जास्त नागरिकांना सुखरुप ठिकाणी हलविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कामी जिल्हा प्रशासनाच्या अनेक टीम लोकांना बचावकार्य करत आहेत.

दरम्यान, लोणी गावाला चारीबाजूने पुराचा वेढा असून या गावांमध्ये सर्वाधिक पाळीव जनावरं देखील आहेत. यामुळे अनेक जनावरं ही पुराच्या वेढ्यात अडकलेली आहेत. तर काही जनावरे वाहून सुद्धा गेल्याची माहिती लोणीचे पोलीस पाटील निळू पाटील यांनी दिली आहे.

याठिकाणी पोलिसांच्या संपूर्ण वेगवेगळ्या टीम्स लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहे. पोलिसांनी वायरलेसच्या माध्यमातून शहरात आणि जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती असल्याचं जाहीर केलं आहे.

पावसामुळे Kalyan-Dombivali मध्ये रस्त्यांची चाळण, वाहनचालकांची प्रवासादरम्यान अडचण

नदीकाठच्या लोकांना रेस्क्यू केल्यानंतर त्यांना जवळची शाळा, मंदिर किंवा उंच ठिकाणी सुखरुप पोहचविण्यात येत आहे. तसंच इतर ठिकाणी अडकलेल्या लोकांची देखील त्याच पद्धतीने व्यवस्था केली जात आहे.

अकोलातून जाणाऱ्या नॅशनल हायवे 6 वर देखील तब्बल एक ते दीड फूट पाणी भरलं असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

    follow whatsapp