Shiv Sena UBT : "अखेर राहुल गांधी यांनी मोदी यांना गुडघ्यावर आणले", ठाकरेंनी घेरलं

मुंबई तक

• 09:25 AM • 10 May 2024

Uddhav Thackeray on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांचा उल्लेख करत केलेल्या विधानावरून ठाकरेंच्या शिवसेनेने पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंचा वार.

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

follow google news

Shiv Sena UBT on PM Modi : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. "मोदी ब्रॅण्ड पूर्णपणे संपला असून, मोदी यांचे वक्तव्य पाहून त्यांच्या या उद्योगपती मित्रांनाही वाटले असेल मूर्ख मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू बरा", असा निशाणा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून साधला आहे. (Uddhav Thackeray's Shiv Sena has commented that Rahul Gandhi has defeated Prime Minister Modi in Lok Sabha campaign)

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी अदानी-अंबानी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर पैसे घेतल्याचा आरोप केला. हा मुद्दा प्रचारात गाजत असून, आता ठाकरेंच्या शिवसेनेने यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. 

शिवसेनेने अग्रलेखात काय म्हटलंय? वाचा प्रमुख मुद्दे...

1) "नरेंद्र मोदी हे 4 जूननंतर पंतप्रधान नसतील. ते झोला घेऊन हिमालयात जातील, की त्यांनी व अमित शहा मिळून जी ‘कांडे’ देशात केली त्याबद्दल त्यांना न्यायालये, चौकशी आयोगासमोर खेटे मारावे लागतील ते सांगता येत नाही; पण मोदी जाता जाता जी भाषणे आणि वक्तव्ये करीत आहेत ती त्यांच्या निराश-हताश मानसिकतेची लक्षणे आहेत."

2) "मोदी यांनी स्वतःला प्रचारात गुंतवण्यापेक्षा त्वरित वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे आहे. तेलंगणातील एका प्रचार सभेत मोदी यांनी त्यांच्या प्रिय अंबानी-अदानींचा उल्लेख केला. 'अंबानी-अदानीने काँग्रेसला पोते भरून काळा पैसा पाठवलाय व आता काँगेसचे शहजादे अंबानी-अदानीचे नाव घेत नाहीत.' यावर राहुल गांधी यांनी त्यांच्या पद्धतीने मार्मिक उत्तर मोदींना दिले."

हेही वाचा >> "तुतारीचा एवढाच पुळका असेल, तर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या"

3) "गांधी म्हणतात, 'एरवी बंद खोल्यांत अंबानी-अदानी करता. आज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलत आहात. मोदीजी, आपण घाबरलात की काय?' गांधी म्हणतात ते खरेच आहे. मोदींची सध्याची भाषणे व भूमिका त्यांचे पाय लटपटले असल्याचे लक्षण आहे."

4) "भाजप अदानी उद्योगसमूहात गुंतवणूक करीत आहे की अदानीसारखे उद्योगपती भाजपात गुंतवणूक करीत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. पण भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, पण मोदी हे आता उलटय़ा बोंबा मारून स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी जगजाहीर करीत आहेत."

हेही वाचा >> "तू आमदार कसा होतो तेच बघतो", शरद पवारांच्या नेत्याला अजित पवारांचं चॅलेंज

5) "मोदी यांनी देश भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या नावाखाली देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात घेतले. या मूर्खपणाची नोंद जगाच्या इतिहासात नक्कीच होईल व जे लोक त्यांच्या गोठ्यात यायला तयार नाहीत त्यांना ईडी वगैरेच्या माध्यमातून तुरुंगात टाकले. अंबानी-अदानी वगैरे उद्योगपती काँग्रेसला टेम्पो भरभरून काळा पैसा देत आहेत व त्याच पैशांवर राहुल गांधी निवडणुका लढत आहेत, असे मोदी सांगत आहेत."

6) "ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे काळ्या पैशांचे हे असे ‘मनी लाँडरिंग’ करणाऱ्या या उद्योगपतींना ‘पीएमएलए’ कायद्यानुसार लगेच अटक करून तुरुंगात टाकायला हवे, पण मोदी असे काहीच करत नाहीत. ते मनाने कमजोर आहेत व छप्पन्न इंच छाती असल्याचा आव आणत आहेत."

7) "मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला केला, पण मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारून स्वतःलाच संकटात टाकले. मोदी ब्रॅण्डचे हे अधःपतन व घसरण आहे. मोदी-अदानी यांचे संबंध जगजाहीर आहेत. मोदी यांचे वक्तव्य पाहून त्यांच्या या उद्योगपती मित्रांनाही वाटले असेल, मूर्ख मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू बरा. मोदी यांचे वक्तव्य गंभीर आहे."

हेही वाचा >> महाराष्ट्रात MVA किती जागा मिळणार? पवारांनी सांगितला मोठा आकडा!

8) "अखेर राहुल गांधी यांनी मोदी यांना गुडघ्यावर आणले. काळ्या पैशांचा स्रोत नक्की कोठे आहे, याचा खुलासा करण्यास भाग पाडले. झोला घेऊन हिमालयात जाण्याची वेळ आणि मुहूर्त मोदींनी मुक्रर केला हे स्पष्ट झाले. मोदी यांची प्रकृती बरी नाही. त्यांना योग्य उपचारांची गरज आहे. मोदींनी वेळीच विश्रांती घेतली नाही तर भाजप 100 आकडाही पार करणार नाही. मोदी ब्रॅण्ड पूर्णपणे संपला आहे!"

    follow whatsapp