Maharashtra Weather : राज्यात सध्या उन्हाळा ऋतू असून हवामानाने कुस बदलली आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान जाणवणार असून काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका पाडण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 17 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढील प्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : बीड : 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून खांबाला बांधलं, 'त्या' कारणावरून नवऱ्यासह सासू-सासऱ्यांच्या अडचणीत वाढ
ADVERTISEMENT
कोकण
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये कोरडं हवामान जाणवेल. तसेच उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. या विभागातील हवामानात फारसा बदल घडणार नाही.
मध्य महाराष्ट्र
धुळे, नाशिक, नंदुरबार, या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्याच हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला.
हे ही वाचा : नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य असेल असा अंदाज आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











