नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

योगेश पांडे

16 Mar 2026 (अपडेटेड: 16 Mar 2026, 04:39 PM)

nagpur news : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये इयत्ता 12 वीत शिक्षण घेणाऱ्या तरुणाने  एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव यश सुनील झाडे (वय 17) असे आहे. तो मानेवाडा येथील जवाहरनगर परिसरात राहत होता. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

nagpur news

nagpur news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'आज माझा पेपर आहे', असं सांगून मुलगा घराबाहेर पडायचा

point

एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून मुलाने उडी मारत जीवन संपवलं

nagpur news : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये इयत्ता 12 वीत शिक्षण घेणाऱ्या तरुणाने एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव यश सुनील झाडे (वय 17) असे आहे. तो मानेवाडा येथील जवाहरनगर परिसरात राहत होता. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : चाकणमध्ये 32 वर्षीय महिलेवर सहा भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हातापायांचे लचके तोडून कपडे फाडले, मृतदेह विवस्त्रच...

'आज माझा पेपर आहे', असं सांगून मुलगा घराबाहेर पडायचा

यशच्या 12 वी बोर्डाची परीक्षा संपली होती, मात्र घरात कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून तो घरी 'आज माझा पेपर आहे', असं सांगून घराबाहेर पडायचा. कुटुंबियांना देखील मुलगा अभ्यासासाठी जात असल्याचं वाटलं होतं. 

एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून मुलाने उडी मारत जीवन संपवलं

पण एक दिवस तरुण घरातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा घरी परतला नाही. त्याचा फोन देखील बंद होता, पोलिसांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. याचदरम्यान नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाणेअंतर्गत एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून त्याने उडी मारत आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं. 

हे ही वाचा : मुलगी सतत फोनवर बोलायची, वडिलांची सटकताच विळ्याने हल्ला करत लेकीला संपवलं, आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. गणेश पेठ पोलीस आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहेत.