पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी, सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यातील लोणीकंद परिसरात सासरी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरा आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय 22) असे असून ती लोनिकांद परिसरातील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क, फेज-2 येथे पतीसोबत राहत होती.

Pune Crime

Pune Crime

मुंबई तक

• 04:57 PM • 15 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी,

point

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

point

पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यातील लोणीकंद परिसरात सासरी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरा आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय 22) असे असून ती लोनिकांद परिसरातील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क, फेज-2 येथे पतीसोबत राहत होती. या संदर्भात तिची आई गंगाबाई अशोक जामकर (रा. वडगाव गुंदा, जि. बीड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जेवणानंतर दिलेल्या दुधात सुनेने गुंगीचं औषध टाकलं, पिताच सासरची मंडळी बेशद्ध पडली, शेवटी डाव साधला

सासू, सासरा आणि दीराने केला छळ

तक्रारीनुसार, 7 मे 2025 पासून वैष्णवीला सासरी वारंवार पैशांसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. पती यशवंत शिवनाथ लाटे हा मारहाण करून शिवीगाळ करत आईकडून पैसे आणण्याची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सासू सखुबाई शिवनाथ लाटे, सासरा शिवनाथ महादेव लाटे आणि दिर सुरज शिवनाथ लाटे यांनीही पैशांसाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने 14 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11:47 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा : मुंबई : कॅमेरा असल्याचं माहिती नाही, महिलेने लिफ्टमध्ये तरुणाला किस केलं, व्हिडीओ थेट सोसायटीच्या ग्रुपवर पडला

दरम्यान, लोणीकंद परिसरात विवाहित महिलांवरील छळाच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    follow whatsapp