Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागात अवकाळी पावसाचं संकट घोंगावणार, हवामानाचा अलर्ट जारी

मुंबई तक

• 05:00 AM • 16 Mar 2026

Maharashtra Weather : महाराष्ट्रात हवामान विभागाने उन्हाचा पारा हा चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या आठवड्याभरात हवामानाच्या दृष्टीने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागेल अशी शक्यता वर्तवलेली आहे. याच विभागात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला. जाणून घेऊयात 16 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

point

निम्म्या महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं सावट

Maharashtra Weather : महाराष्ट्रात हवामान विभागाने उन्हाचा पारा हा चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या आठवड्याभरात हवामानाच्या दृष्टीने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागेल अशी शक्यता वर्तवलेली आहे. याच विभागात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला. जाणून घेऊयात 16 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : 'तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस' म्हणत सासरच्यांकड़ून छळ, अखेर सुनेनं विष पिऊन संपवलं जीवन

राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

कोकण 

कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट कामय राहणार आहे. मार्च महिन्यांच्या मध्यावर हवामानाचा मोठा बदल जावण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर मुंबईसह उत्तर कोकणात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तापमानात घट होण्याची अधिक शक्यता आहे. उष्णतेत घट निर्माण होऊन अवकाळी पावसाचं संकट घोंगावण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीठ होण्याचा अंदाज आहे.  16 मार्च रोजी सोलापूरात हवामानाचा यलो अलर्ट जारी केला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात उष्णतेची लाट आली होती, परंतु अवकाळी पावसाचं सावट देखील असेल. छत्रपती संभाजीनगर. जालना, हिंगोली आणि नांदेडमध्ये पुढील 24 तासांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. 

हे ही वाचा : Assembly Election 2026: पाच राज्याच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, 'या' दिवशी कोणाचा होणार खेला होबे?

विदर्भ

विदर्भात सोमवारपासून अवकाळी पावसाचा धोका निश्चित आहे. विजांच्या कटकडाटासह पाऊस हलका ते मध्यम स्वरुपात कोसळण्याची अधिक शक्यता आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पुढील काही दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला.