धुळ्यातील चाळीसगावात बंदुक साफ करताना गोळी सुटली अन् महिलेला लागली, पीडितेची प्रकृती चिंताजनक

Dhule News : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे परिसरातील ईस्ट हुडका येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बंदूक साफ करताना गोळी सुटली आणि थेट एका महिलेला लागली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. संबंधित प्रकरणात चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव जुबेर पठाण असे आहे. 

Dhule News

Dhule News

मुंबई तक

• 03:25 PM • 15 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बंदूक साफ करताना गोळी सुटली अन्...

point

जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Dhule News : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे परिसरातील ईस्ट हुडका येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बंदूक साफ करताना गोळी सुटली आणि थेट एका महिलेला लागली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. संबंधित प्रकरणात चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव जुबेर पठाण असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्राची अवस्था बघून अस्वस्थ झालात? शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

बंदूक साफ करताना गोळी सुटली अन्...

पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तापस केला असता, मोठी माहिती समोर आली. जुबेर पठानचं हत्यार विक्रीचे दुकान होते. चाळीसगाव रोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, त्या रात्री चाळीसगाव रोड परिसरात बंदूक साफ करताना गोळी सुटली आणि हाताला लागल्याने महिला जखमी झाली. 

जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल

जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलिसांनी चाळीसगाव रोज पोलिसांच्या समवेतच घटनास्थळी भेट दिली. 

हे ही वाचा : 14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवलं, नंतर रेल्वेत जबरदस्ती नेत केले लैंगिक अत्याचार, तरुण पळाला अन्...

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, चाळीसगाव रोड पोलिसंनी अवघ्या दोन तासांतच 'जुबेर पठण' याला ताब्यात घेतले, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरु आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. 

    follow whatsapp