बीड : परळीत 16 वर्षीय मुलीला गोड बोलून बंद दाराआड नको तेच... कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

Beed crime : बीड जिल्ह्यतील परळी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील धारावती तांडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडल्याचे वृत्त आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधम्यांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Beed crime

Beed crime

मुंबई तक

14 Mar 2026 (अपडेटेड: 14 Mar 2026, 03:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीला गोड गोड बोलून बंददाराआड केला आत्याचार

point

घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

Beed crime : बीड जिल्ह्यतील परळी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील धारावती तांडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडल्याचे वृत्त आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधम्यांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यादरम्यान परिसरात संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अंगणवाडी सेविकेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, हाणामारीत लेकीला वाचवण्यास गेलेल्या आईची हत्या

मुलीला गोड गोड बोलून बंददाराआड केला आत्याचार

घडलेल्या घटनेनुसार, आरोपींनी पीडित मुलीचा गोड बोलून काटा काढला. तिला घरात बोलावून आपल्या घरी नेले. मुलगी घरात येताच त्यांनी आतून दरवाजा बंद केला. नंतर आरोपीने पीडितेचे हातपाय बांधले आणि तिच्या तोंडात बोंळा कोंबला. नराधमांनी गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

अत्याचारानंतर, 'जर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू,' अशी धमकी देऊन आरोपींनी पीडितेला सोडून दिले. पीडित मुलीने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला होता. कुटुंबियांनी तात्काळपणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित नराधमांवर लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : पालघरमध्ये पोलिसांच्या भीतीपोटी तरुण धावू लागले, मालगाडीने दिली धडक अन् तिघांचा करुण अंत

घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. आरोपींना लवकर अटक केली जावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

    follow whatsapp