Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कुठे पावसाचा यलो तर कुठे पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आला होता. अशातच 2 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाची शक्यता ही पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं
कोकण
कोकणात पालघर, ठाणे, मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. अहिल्यानगर आणि जळगावमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय? मुलाखतीत सगळे खळखळून हसले...
विदर्भ
विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत पावसाचा कोणाताही अलर्ट वर्तविण्यात आला नाही.
ADVERTISEMENT












